Shah Rukh Khan Press Conference  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan - Gauri Khan: बायकोला कसं सांभाळू? शाहरुख खानला नेटकऱ्याचा अजब प्रश्न; किंग खानने दिले तितकेच भन्नाट उत्तर

Ask SRK: शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्टेड असतो.

Pooja Dange

Netizens Ask Shah Rukh Khan How To Handle Wife:

बॉलिवूडचा बादशाह, शाहरुख खान सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित 'जवान' या चित्रपटात शाहरुखसोबत पहिल्यांदा साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपतीही दिसणार आहे. यासोबतच दीपिका पदुकोणचाही या चित्रपटात कॅमिओ आहे.

शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्टेड असतो. अलीकडेच अभिनेत्याने त्याच्या ट्विटर हँडलवर #AskSRK सत्र ठेवले होते. जिथे चाहते शाहरुखला प्रश्न विचारत होते आणि तो उत्तरे देत होते.

दरम्यान, त्याच्या एका चाहत्याने अभिनेत्याला प्रश्न केला की, 'सर पत्नीसोबत #जवान बघण्याचा प्लॅन केला आहे, पण प्रत्येक वेळी ती उशीर करते, #पठानच्या वेळीही तिला उशीर झाला... मला काही टिप्स द्या. जेणेकरून आम्ही वेळेत पोहोचू शकता #jawandekhne'.

शाहरुख खान त्याच्या चाहत्याला उत्तर देत म्हणाला, 'बस झाला आता बायकांच्या तक्रारी नको! प्लीज! मी माझ्या बायकोला सांभाळू शकत नाही आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम माझ्यावर टाकता!!!! सर्व बायकांना विनंती नो टेन्शन #जवान पाहण्यासाठी जा. शाहरुखचे हे उत्तर खूप नेटकऱ्यांना खूप आवडले आहेआहे. याशिवाय आणखी एका व्यक्तीने अभिनेत्याला त्याच्या पत्नीबद्दल प्रश्न विचारला.

#AskSRK सत्रादरम्यान, चाहता शाहरुखला म्हणाला, 'सर, मला दोन बायका आहेत, एकाला #Jawan फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहायचा आहे आणि दुसरीला फर्स्ट डे लास्ट शो पाहायचा आहे. मी दिवसातून दोनदा चित्रपट कसा बघू, सर कृपया मदत करा.' यावर प्रतिक्रिया देताना शाहरुख म्हणाला, 'जवान'मध्येही दोन नायिका आहेत. दोन्ही बायकांना सोबत घेऊन जा. जेव्हा मी वेगवेगळ्या हिरोईनसोबत स्क्रीनवर येईन तेव्हा एकदा एकीचा हात पकड आणि एकदा दुसरीचा.'

शाहरुख खानच्या या ट्विटर सत्राच्या शेवटी त्याने जवानमधील नवीन गाण्याचा टीझर शेअर केला. दरम्यान त्याच्या चाहत्यांनी त्याला यावेळी जवानचा ट्रेलर कधी येणार हे देखील विचारले. तर सलमान खानने जवानच्या प्रमोशनसाठी टक्कल केले असल्याचे देखील नेकरी यावेळी म्हटले आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT