Shah Rukh Khan-Nayanthara Video From Jawan Gets Leaked Instagram
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan Viral Video: 'जवान' चित्रपटातील शाहरुखचा ऑडिओ आणि व्हिडिओ लीक

Shah Rukh Khan-Nayanthara Romantic Video: शाहरुख आणि नयनताराचे काही व्हिडिओ ऑनलाइन लीक झाले आहेत.

Pooja Dange

Shah Rukh Khan-Nayanthara Video From Jawan Gets Leaked: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता शाहरुखचे जावं आणि डंकी हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

शाहरुख खान आता त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री नयनतारासोबत रोमँटिक गाण्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या दोन्ही स्टार्सचे काही व्हिडिओ ऑनलाइन लीक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि नयनतारा जेटीवर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये शाहरुख खानने काळ्या रंगाच्या कपडे घातले असून नयनतारा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. दोघेही चित्रपटाच्या गाण्याच्या सीक्वेंसचे शूटिंग करताना दिसत आहेत. या प्रसंगाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आता ऑनलाइन लीक झाले आहेत. तर शूटिंगची चित्रिकरण लपवून ठेवण्याच्या प्रयत्नात चित्रपटाची टीम पूर्णपणे गुंतलेली दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये केवळ रोमँटिक गाण्याचा टीझर दाखवण्यात आला आहे. व्यवस्थित ऐकले तर गाण्याचे बोल देखील समजतील. मात्र, असे तर नाही की या चित्रपटाच्या गाण्याच्या सीक्वेन्सचाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चित्रपटाच्या सेटवरील काही छायाचित्रेही सोशल मीडियावर लीक झाली आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खानचे वेगवेगळे लूक दिसत आहे. (Latest Entertainment News)

मिळालेल्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या मुख्य भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तथापि, असे म्हटले जाते की शाहरुख खानने नयनतारा आणि दीपिका पदुकोणसोबत काही गाण्याचे सिक्वेन्स शूट करायचे आहेत. दिग्दर्शक एटली हा चित्रपट जूनमध्येच त्याच्या ठरलेल्या शेड्यूलनुसार प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शाहरुख खानचा काही दिवसांपूर्वी डंकी या चित्रपटामधील लूक लीक झाला होता. शाहरुखचे या लूकमधील फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये शाहरुख खान आर्मी युनिफॉर्ममध्ये दिसत आहे.

शाहरुख खानचा नुकताच टाइम मॅगझीनने १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर शाहरुखचा फोटो लावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरसह वसई-विरार शहरात पावसाची रिपरिप

Nikhil Bane : फायनली ती माझ्या आयुष्यात आली; हास्यजत्रा फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Majalgaon Rain : माजलगावमध्ये ढगफुटी; गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली, गावांमध्ये पाण्याचा वेढा

Kalyan Crime : हॉस्पिटलच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याला लुबाडले, लाखो रुपये उकळले, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Bigg Bossनं घरातील 2 सदस्यांना सुनावली कठोर शिक्षा, संपूर्ण सीझनसाठी केले नॉमिनेट

SCROLL FOR NEXT