Not Ramaiyya Vastavaiya Song Released Instagram/ @iamsrk
मनोरंजन बातम्या

Not Ramaiyya Vastavaiya Song: ‘जवान’ मधलं नवं गाणं प्रदर्शित, किंग खान आणि नयनताराच्या हूक स्टेप्सवर चाहते फिदा

Jawan Film New Song Released: चित्रपट प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना, चित्रपटातील आगामी गाणं प्रदर्शित झालं आहे.

Chetan Bodke

Not Ramaiyya Vastavaiya Song Released

शाहरूख खानच्या अपकमिंग ‘जवान’ चित्रपटातलं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या ७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटातील आतापर्यंत दोन गाणे प्रदर्शित झाले असून दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अशातच चित्रपट प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना, चित्रपटातील आगामी गाणं प्रदर्शित झालं आहे. गाण्याचं नाव ‘नॉट रमैया वस्तावैया’ असं असून सध्या या गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा एक प्रिव्ह्यू व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला होता. तेव्हापासून चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केलेला नाही. त्यापूर्वी निर्मात्यांनी प्रेक्षकांसमोर गाण्यांची झलक दाखवली. आतापर्यंत चित्रपटातील जिंदा बंदा आणि चलेया ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर अशातच तिसरं गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. चित्रपटामधील ‘नॉट रमैया वस्तावैया’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) यांचा अफलातून डान्स पाहायला मिळत आहे.

अनिरुद्ध रविचंदर, विशाल ददलानी आणि शिल्पा राव यांनी ‘नॉट रमैया वस्तावैया’ हे गाणं गायलं आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी गाणं संगीतबद्ध केलं असून कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. ‘नॉट रमैया वस्तावैया’ या गाण्यामध्ये शाहरुख आणि नयनताराचा रोमँटिक अंदाज आणि अफलातून अंदाज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत शाहरूख खान सोबतच विजय सेथुपती, सान्या मल्बोत्रा, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, आणि दीपिका पादुकोण हे कलाकार प्रमुख भूमिका झळकणार आहेत.

येत्या ७ सप्टेंबरला शाहरूखचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे.

सेन्सॉर बोर्डाकडून ‘जवान’ला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने 7 महत्त्वपूर्ण बदल सुचवत मंजुरी दिली आहे. ‘जवान’ची एकूण वेळ साधारण 169.18 मिनिटे आहे. U/A प्रमाणपत्राचा अर्थ असा की, सर्व वयोगटातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात. पण हा चित्रपट १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी हा चित्रपट पालकांसोबतच पाहणे आवश्यक आहे. सोबतच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना जवळपास ७ सीन्सवर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT