बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक आणि अतुट नात्याला समर्पित असणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). या सणाची प्रत्येक बहीण आणि भाऊ आतुरतेने वाट पाहत असतो. येत्या ३० ऑगस्टला अर्थात बुधवारी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. बहिण भावाचे नाते आपल्याला रियल आयुष्यातच नाही तर, अनेक क्षेत्रातदेखील पाहायला मिळतात.
फक्त राजकारणातच नाही तर सिनेविश्वात आणि क्रिडा क्षेत्रातही आपण भाऊ- बहिणीच्या नात्यातील गोडवा पाहिला आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण घरबसल्या आपल्या भाऊ- बहिणींसोबत आणि फॅमिलीसोबत भाऊ- बहिणींच्या नात्यावरील खास चित्रपट पाहू शकता. चला तर जाणून घेऊया चित्रपटाविषयी...
अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावली असून भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटात अक्षयची आणि ४ बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video आणि Zee 5 वर पाहू शकता.
झोया अख्तर दिग्दर्शित 'दिल धडकने दो'मध्ये एका श्रीमंत कुटुंबीयाची कथा दाखवण्यात आली आहे. रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रपटाची कथा चित्रित करण्यात आली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटीवर हा चित्रपट उपलब्ध असून भावंडांच्या प्रेमाचे हृदयस्पर्शी चित्रण सादर केले आहे.
'हम साथ साथ है' या चित्रपटामध्ये मोहनीश बहल, सलमान खान, सैफ अली खान आणि नीलम कोठारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. भावंडांच्या प्रेमाचे हृदयस्पर्शी चित्रण करणारा हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित झाला आहे.
1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेशम की दोरी' या चित्रपटात भाऊ-बहिणीचे प्रेम दाखवण्यात आले आहे. चित्रपटात धर्मेंद्र महत्त्वाच्या भूमिकेत असून चित्रपटामध्ये 'बेहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है' हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. आजही प्रेक्षकांना हे गाणं ऐकायला आवडतं.
सलमान खान, जॅकी श्रॉफ आणि रंभा स्टारर 'बंधन' हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सलमान आणि अश्विनी भावेने भाऊ- बहिणींचे पात्र साकारले होते.
हृतिक रोशन आणि करिश्मा कपूरचा 2000 प्रदर्शित झालेला फिजा हा चित्रपट भाऊ-बहिणींच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटाची कथा काश्मिरमधील दहशतवादाभोवती फिरत असून चित्रपट यूट्यूबवर तुम्ही घरबसल्या पाहू शकता.
चित्रपटामध्ये सुनील शेट्टीने एका भावाचे पात्र साकारले आहे. चित्रपटाची कथा सुनीलच्या ५ बहिणींभोवती फिरत आहे. हा चित्रपट तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी घरबसल्या यूट्यूबवर पाहू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.