सनी देओल गदर २ चित्रपटाचं सर्वत्र गाजावाजा आहे. जावन चित्रपटानंतर ब-याच दिवसांनी बॉलिवूडचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड देखील बनविले आहेत.
सनी देओल हा केवळ एक उत्तम अभिनेता नाही तर चित्रपट निर्मितीही आहे. परंतु सनी देओलला निर्माता म्हणून अद्याप यश मिळवता आले नाही. गदर 2 च्या यशादरम्यान, सनी देओलने निर्माता म्हणून स्वतःला कंगाल घोषित केले आहे.
सनी देओलने बीबीसी एशिया नेटवर्कला एक मुलखात दिली आहे. यावेळी सनीने गदर 2 चित्रपटाच्या यशाबद्दल आणि निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीबद्दल खूप काही सांगितले. सनीने सांगितले की, तो जेव्हाही निर्माता म्हणून चित्रपट करतो तेव्हा तो कंगाल होतो. सनी देओल पुढे म्हणाला. 'इंटरटमेन्ट इंडस्ट्रीला खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात हे कंट्रोल कारण सोपं होत.
तुम्हाला फक्त डिस्ट्रिब्युशन करायचं होत आणि लोक देखील होते ज्यांच्याशी आमचा नेऊनि संबंध यायचा. आता सगळं कॉर्पोरेट्स झाला आहे. लोकांना वाढ बघणं कठीण झालं आहे. तुम्हाला तुमचा पीआर करावा लागतो, धावपळ करावी लागते, नाहीतर ते तुम्हाला थिएटर उपलब्ध करून देता नाहीत. त्यांना तिथे कोणीही येणार नाही असे वाटते.
गेल्या दशकात मला माझ्या चित्रपटांबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुम्ही विशिष्ट प्रकारचा सिनेमा करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला पाठिंबा मिळत नाही.'
सनी देओलने तो एक अभिनेता म्हणून जास्त आनंदी असल्याचं म्हटलं आहे. 'मी निर्माता, दिग्दर्शक झालो, अनेक भूमिका साकारल्या. माणूस फक्त एकच गोष्ट करू शकतो. म्हणून मला वाटत सगळं सोडून द्यावं, फक्त अभिनेता व्हाव. तर आता मला हेच करायचे आहे. एक अभिनेता म्हणून मी जमेल तेवढे चित्रपट करत राहीन.
सनी देओलचा 'गदर 2' ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एवढ्या तीन दिवसात ३०० कोटींची कमाई केली आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तारा सिंग आणि साकीना २२ वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.