
करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री शबाना आजमी (Shabana Azmi) यांच्या किसींग सीनची चर्चा अजूनही सुरुच आहे. चित्रपटात दोघांच्याही लव्हस्टोरी लक्ष वेधले आहे. चित्रपटामध्ये त्यांचा किसींग सीन असून त्या सीनमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा होतेय. या सीनवर सनी देओलसबोत अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतंच चित्रपटातल्या किसींग सीनवर धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलने प्रतिक्रिया दिली आहे, सध्या अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा होतेय.
ईशाने आपल्या वडीलांच्या किसींग सीनवर ‘फिल्मी ग्यान’ या वेबसाईटला दिलेल्या प्रतिक्रियेत ती म्हणाली की, “मला त्या सीनबद्दल काहीही माहित नव्हतं. आमच्यासाठी तो सीन म्हणजे, एक सरप्राइज होते. दोघेही चित्रपटामध्ये खूपच प्रेमळ दिसत होते आणि मुख्य म्हणजे, ते दोघेही व्यावसायिक कलाकार आहेत.”
हेमा मालिनी यांनीही धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसींग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “मी अजून तो चित्रपट पाहिलेला नाही. पण प्रेक्षक त्या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यांच्या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मला खूपच आनंद वाटतोय. त्यांना कॅमेऱ्यासमोर राहायला नेहमीच आवडते.”
सोबतच यावेळी त्यांना मुलाखतीमध्ये तुम्ही देखील ऑनस्क्रिन किसिंग सीन करणे सोईचे आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हेमा मालिनी यांनी आपणही किसिंग सीन करायला तयार असल्याचे सांगितले.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ एकंदरीत चित्रपटाबद्दल सांगयचे तर, मुख्य भूमिकेमध्ये आलिया आणि रणवीरसह शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले असून निर्मिती करण जोहर, हिरो जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण १४७. ७५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.