Jawan Review Instagram
मनोरंजन बातम्या

Jawan Review: ‘पठान’पेक्षा सरस ठरला ‘जवान’, शाहरुखला पाहून चाहते झाले जबरा ‘फॅन’

Jawan Review: शाहरुखचे किलर लूक, ॲक्शनचा धमाका आणि इमोशन्सने मिश्रित ‘जवान’च्या मार्फत चाहत्यांकडून आपल्या उत्तम कामाची पोचपावती मिळवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jawan Review

२०२३ मध्ये बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटांमध्ये सध्या ‘जवान’ची बरीच चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरची प्रचंड चर्चा सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुखचे विविध लूक, ॲक्शन, दमदार स्टारकास्ट असलेल्या हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. शाहरुख आणि दिग्दर्शक ॲटली ने चित्रपटाची रचना अगदी व्यवस्थित रित्या केलेली दिसत आहे.

शाहरुखचे किलर लूक, ॲक्शनचा धमाका आणि इमोशन्सने मिश्रित ‘जवान’च्या मार्फत चाहत्यांकडून आपल्या उत्तम कामाची पोचपावती मिळवली आहे. चित्रपटाची कथा ही एकाच गोष्टीवर आधारित नाही, चित्रपटाच्या कथेमध्ये तुम्हाला अनेक वेगवगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. केवळ एक प्रेक्षक म्हणून नाही तर या देशाचा नागरिक म्हणून तुम्हाला या कथा नक्कीच भावतील. ‘जवान’च्या स्क्रिप्टमध्ये पहिल्या एका तासात इतक्या कथा पाहायला मिळतील, ज्या पूर्ण एका चित्रपटातही पाहायला मिळणार नाहीत, कथेची वैविध्यता प्रेक्षकांना खूप उत्तमरित्या पाहावी लागणार आहे. (Bollywood)

चित्रपटाच्या कथेला ट्रेन हायजॅकने सुरुवात होते. ट्रेन हायजॅकने करणाऱ्या ‘जवान’ने (बाल्ड लूकमध्ये दिसणारा शाहरुख) ट्रेनमधील ३७६ प्रवाशांच्या बदल्यात कृषीमंत्र्यांशी बोलण्याची मागणी केली आहे. तो कृषीमंत्र्यांकडे एवढी रक्कम मागतो, जी १५ मिनिटांत व्यवस्था करणेही सरकारला शक्य नाही! पण अपहरण झालेल्या मेट्रो ट्रेनमध्ये एका मोठ्या “बिझनेस मॅन”ची मुलगी आहे. त्यामध्ये कालीची या मोठ्या बिझनेस मॅनची (विजय सेतुपती) मुलगी आहे. स्थानिक लोकांवर काहीजण हल्ले करतात. अशावेळी जवान लोकांची सुटका करतो. मसीहा म्हणून ठरलेला जवान का येतो? हे जेव्हा तुम्ही चित्रपट पाहता त्यावेळी त्याचं कोडं सुटतं. (Bollywood Actor)

दुसरीकडे विक्रम राठोड म्हणून शाहरुख डबल रोलमध्ये दिसतो. शाहरुखने देशातील भ्रष्टाचार, राजकीय लोकांनी शेतकऱ्यांना दिलेली अपमानस्पद वागणूक, त्यांचे झालेले हाल, भारतातील आरोग्य व्यवस्था यावर त्याच्या पद्धतीनं भाष्य करण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये त्याच्यासोबत प्रियामनी, गिरीजा ओक, सान्या मल्होत्रा, लहेर खान, संजिता भट्टाचार्य, अमरिथा अय्यर या अभिनेत्रींनी त्यांच्या टीममध्ये भूमिका साकारली आहे. अभिनयाबद्दल बोलायचे तर, शाहरुखने उत्तम भूमिका साकारली आहे.

चित्रपटामध्ये शाहरुखने डबल रोल साकारलाय. आझाद कोण आणि विक्रम राठोड कोण ? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल. व्हिलनच्या भूमिकेत विजय सेतुपथीने उत्तम भूमिका साकारली. शाहरुख आणि विजय हे दोघेही एकमेकांच्या विरोधी भूमिकेत दिसत असून हे दोघेही ‘हम किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिलेय. (Bollywood Film)

तर चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिका आणि नयनताराने उत्तम काम केले आहे. शाहरुखच्या सहा जणींची टीम खूपच प्रभावी आहे. सान्या मल्होत्रा आणि प्रियामनी या दोघीही स्क्रिन्सच्या समोर दिसत आहे. ॲटलीचं उत्तम दिग्दर्शन असून चित्रपटाचा पूर्वार्ध जरा रटाळवाणा आहे.

मात्र उत्तरार्धात शाहरुखसह सर्वच कलाकार प्रेक्षकांचं मन जिंकतात. अखेरच्या पंधरा ते वीस मिनिटांनी प्रेक्षकांचे मन वेधलेय. संवाद आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहेत. चित्रपटामध्ये वडील आणि मुलाच्या डायलॉगने, उंगलीवरून काही डायलॉगने लक्ष वेधले.

शाहरुखने पहिल्यांदाच बिनधास्तपणे राजकीय इशारा देणारे डायलॉग चित्रपटातून दिलेय. चित्रपट काही मुद्द्यांमुळे रटाळ वाटतो. त्यामध्ये गाण्यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. गाण्यांनी प्रेक्षकांचा मुड खराब केला आहे. पण किंग खानची चित्रपटातील ॲक्शन पाहून हा चित्रपट नक्कीच ‘पठान’ला मागे टाकेल, यामध्ये शंका नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT