आजचा दिवस शाहरुखच्या चाहत्यांसाठी एका सणासारखाच आहे, कारण आज लाडक्या अभिनेत्याचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने चाहत्यांची प्रचंड उत्सुकता ताणून धरली होती. सकाळपासून थिएटरमध्ये आणि थिएटरबाहेर प्रचंड चाहत्यांची गर्दी दिसून येत आहे.
चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा दिसून येत आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होताच, आता शाहरुख खान आणि निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. चित्रपट प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच चित्रपट लीक झाला आहे. ‘जवान’ एचडी प्रिंटमध्ये काही तासातच चित्रपट लीक झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच ऑनलाईन पायरसीचा बळी ठरला आहे. तमिलरॉकर्स, Mp4movies, Pagalworld, Vegamovie, Torrent आणि Filmyzilla सह अनेक साइट्सवर हा चित्रपट फुल एचडी प्रिंटमध्ये मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
सोबतच, चित्रपट लीक झाल्यामुळे कमाईवर त्याच्या मोठा परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निर्मात्यांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ‘जवान’ प्रमाणेच ‘पठान’ चित्रपट देखील ऑनलाईन पायरसीचा बळी ठरला होता. पण तरीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
‘जवान’ने प्रदर्शनाआधीच रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. चित्रपटाने प्रीसेलमध्ये १७ कोटींहून अधिकची दमदार कमाई केली आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुख आणि नयनताराचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी ‘पठान’लाही मागे टाकेल अशी चर्चा होत आहे. त्यातच आता चित्रपट लीक झाल्यामुळे त्याचा फटकाही कमाईवर बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ आज अर्थात ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.