Shabana Azmi On Shatrughan Sinha Google
मनोरंजन बातम्या

Shabana Azmi On Shatrughan Sinha: कधीच सेटवर वेळेवर आले नाही शत्रुघ्न सिन्हा; शबाना आझमी यांनी केला खुलासा

Shabana Azmi On Shatrughan Sinha: शबाना आझमी यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. पण, त्यांनी शत्रुघ्न सिन्हा कधीच सेटवर वेळेवर येत नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shabana Azmi On Shatrughan Sinha : शबाना आझम या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहेत. आजही शबाना आझमी बॉलीवूडमध्ये त्याच उत्साहात काम करत आहेत आणि आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकत आहेत. राजेश खन्ना ते रणवीर सिंग पर्यंत अनेक बड्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. शबाना आझमी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला आहे की कोणते कलाकार नेहमी सेटवर उशिरा येतात आणि कोणते वक्तशीर होते.

शबाना आझमी यांना एका मुलाखतीदरम्यान एक प्रसंग आठवला. त्यांनी सांगितले, त्यावेळी आम्ही एकावेळी १२ चित्रपटांमध्ये एकत्र काम करायचो. मी संजीव कुमार यांच्यासोबत नमकीन चित्रपटामध्ये काम करत होते. फिल्मसिटीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते आणि सकाळी ७ वाजता शिफ्ट सुरू व्हायची. पण, संजीव कुमार कधीच साडेअकरापूर्वी आले नाहीत. मी आईला विनंती करायचो की आई, प्लीज मला लवकर उठवू नकोस, हिरो कधीच वेळेवर येत नाहीत. पण झाली आई वक्तशीर असल्यामुळे मला नेहमी ७ वाजता जाऊन सेटवर बसावे लागायचे.

शत्रुघ्न सिन्हाही सेटवर यायचे उशिरा...

शबाना आझमी पुढे म्हणाल्या 'माझी आई स्वतः एक अभिनेत्री होती आणि थिएटरच्या पार्श्वभूमीतून आली होती. ती मला सल्ला द्यायची बेटा, याचा तुझ्याशी काही संबंध नाही. तुम्ही तुमच्या निर्मात्याला ७ वाजता येण्याचे वचन दिले आहे, त्यामुळे जरी शूट सुरू झाले नाही तरी वेळेवरच जा. शबाना आझमी त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल बोलल्या. नमकीनच्या शूटिंगनंतर ती फिल्मिस्तानला जायची कारण तिथे ती २ ते १०ची शिफ्टमध्ये शूटिंग करायची पण शत्रुघ्न सिन्हा संध्याकाळी ७ वाजता यायचे. राजेश खन्ना हे संजीव कुमार आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यापेक्षा वेळेवर येण्याबद्दल काटेकोर होते. मला वाटते की आता बॉलिवूडमध्ये बरेच बदल झाले आहेत. पण त्यावेळी शशी कपूर आणि अमिताभ बच्चन हे दोन व्यक्ती वक्तशीर होते.

शबाना आझमी यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शबाना आझमी शेवटची आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत धर्मेंद्रही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा एक किसिंग सीनही होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : - सह्याद्रीत मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT