Selena Gomez  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Selena Gomez : कोट्यवधींची मालकीण कधीच होऊ शकणार नाही आई, स्वत: सांगितली व्यथा

Popular Singer Can't Become A Mother : लोकप्रिय गायिका, अभिनेत्री आणि बिझनेस वुमन कधीही आई होई शकणार नाही याचा खुलासा तिने स्वतः केला आहे.

Shreya Maskar

आई होणं हे जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. प्रत्येक महिलेला आई होण्याचे सुख अनुभवायचे असते. पण काही लोक या स्वर्ग सुखापासून वंचित राहतात. यामागे अनेक कारणे आहेत. काहींचे आरोग्य त्यांना साथ देत नाही. तर काहींची स्वः इच्छा नसते. मात्र मुलं जन्माला घालणं सर्वात भाग्याची गोष्ट आहे. मात्र हे सुख अमेरिकेतील लोकप्रिय गायिका, अभिनेत्री, निर्माती आणि बिझनेस वुमन सेलेना गोमेझ (Selena Gomez ) हिच्या वाट्याला नाही. नुकतेच सेलेना गोमेझ हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती कधीच आई होऊ शकणार नाही याची बातमी तिने दिली आहे. सेलेना आता ३२ वर्षांची आहे. सेलेनाही 1.3 बिलियन डॉलरची मालकीण आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत तिने या बद्दलचा खुलासा केला आहे. सेलेना म्हणाली की, मी स्वत:च्या मुलाला कधीच जन्म देऊ शकणार नाही. तसेच तिने या मुलाखतीत त्याचे कारणही स्पष्ट केले आहे. सेलेना काहीकाळापासून 'ल्युपस' नावाच्या आजाराशी लढत आहेत. तिला ऑटोइम्यून हा आजार आहे. जो आपली शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. या आजारात शरीरातील टीश्यूजवर हल्ला होतो. २०१७ मध्ये सेलेनाने किडनी ट्रान्सप्लांट केले होते. तसेच सेलेना बायपोलर डिसऑर्डर मानसिक आजाराशी देखील सामना करत आहे.

यावर उपाय म्हणून सेलेना मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे. तसेच सरोगसीद्वारे मुलाला जन्म देईल असे म्हटलं आहे. तसेच ती म्हणाली की, मी भाग्यवान आहे की, सरोगसी किंवा दत्तक घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हाच माझा शेवटचा पर्याय आहे. सेलेना गोमेझची आईला देखील दत्तक घेण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT