Vaishali Samant PR
मनोरंजन बातम्या

Vaishali Samant: 'मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन...'; वैशाली सामंतची सरकारकडे मागणी

Vaishali Samant: नुकत्याच झालेल्या सावनी रविंद्रच्या पॉडकास्टमध्ये पार्श्वगायिका वैशाली सामंतने मराठी कलाकारांची कैफियत अगदी स्पष्टपणे मांडली.

Shruti Vilas Kadam

Vaishali Samant: राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने Music Podcast सुरू केला असून, त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलतं केलं आहे.सावनीच्या या पॉडकास्टला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये पार्श्वगायिका वैशाली सामंत होत्या आणि त्यांनी मराठी कलाकारांची कैफीयत अगदी स्पष्टपणे मांडली.

नुकतच सावनी रविंद्रच्या पॉडकास्टसाठी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत आली होती. सावनीने आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय बदल हवे आहेत असं विचारल्यावर वैशाली सामंत म्हणाल्या की, सरकराने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत. “आपल्या मराठी कलाकारांना PF मिळतो का तर नाही, पेंशन मिळते का तर नाही. मला असं वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे बेनिफिट्स योग्य वेळेत मिळाले तर तो नक्कीच गगन भरारी घेईल.

आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते. थोडसं सरकारने मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालाव. सरकारने प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट द्याला हवे त्यांचा संपूर्ण आढावा देखील घ्यावा. आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज आहे. आता आपलं Competition हे मराठीत मर्यादित न राहता जगातल्या प्रत्येक कलाकारांशी आहे.

आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे. कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी आहे आणि हे सरकारला कळायला हवं. आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे.” असं म्हणत वैशाली सामंत यांनी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. आता सरकार याकडे कितपत लक्ष घालेल हे पाहणं गरजेच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT