marathi movie saam tv
मनोरंजन बातम्या

Saubhagyawati Sarpanch: महिला सशक्तीकरणाची प्रेरणादायी कथा सांगणारा ‘सौभाग्यवती सरपंच’ चा ट्रेलर लाँच

Marathi Movie: प्रजाकसत्ता दिनानिमित्त प्रेक्षकांना खास वेब सिरीज पाहायला मिळाला आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ या वेब सिरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

Saam TV News

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेक्षकांना खास आणि हटके वेब सिरीज पाहायला मिळणार आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ ही ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारी वेब सिरीज 22 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होत असून, १५ जानेवारीला या वेब सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

‘सौभाग्यवती सरपंच’ ही फक्त एका स्त्रीच्या यशाची कहाणी नाही, तर ती प्रत्येक महिलेच्या संघर्षाला प्रेरणा देणारी आहे. महिला सशक्तीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असून, स्वातंत्र्य, शिक्षण, आणि नेतृत्व या तीन गोष्टी प्रत्येक महिलेचे हक्क आहेत हेच या वेबसिरीसमधून आपल्याला पाहायला मिळेल.

एका सामान्य गृहिणीच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या यशाचा प्रवास म्हणजेच ‘सौभाग्यवती सरपंच’. महिला आरक्षित सरपंच पदावर निवडून आल्यानंतर एका सध्या गावातली गृहिणी कशी विकासासाठी स्वतःला झोकून देते आणि रूढीवादी मानसिकतेला कसा प्रतिउत्तर देते, याची प्रेरणादायी कथा या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते.

अवलीच्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक संदेश ठरणार आहे – स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.

या सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, आशा ज्ञाते, नागेश भोसले, अश्विनी कुलकर्णी, पद्मनाभ भिंड आणि अन्य प्रमुख कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. संतोष कोल्हे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले असून, ही कथा नातेसंबंध, पुरुषप्रधान व्यवस्थेतील मानसिकता, आणि महिला सशक्तीकरण यावर भाष्य करते.

म्हणूनच प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र संधीवर, महाराष्ट्रातील ग्रामीण भारतातील महिलांच्या शक्तीचा हा अनोखा प्रवास ज्यात त्यांनी कधीही न पाहिलेल्या स्वप्नांची भरारी 22 जानेवारीपासून फक्त अल्ट्रा झकासवर ‘सौभाग्यवती सरपंच’ तुम्हाला पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

Maharashtra News Live Update: उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत- परिवहन मंत्री

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

SCROLL FOR NEXT