Bharat Jadhav
दिल्लीतील ड्युटी मार्गावर परेड आयोजित केली जाते. यात भारतीय लष्कराचे सामर्थ्य, संस्कृती, वारसा आणि विविधता दिसून येते.
प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याचं असेल तर योग्य नियोजन करा.
प्रजासत्ताक दिन २०२५ ची परेड पाहायची असेल तर आता तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे तिकीट बुक करू शकता.
संरक्षण मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिन परेड आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय.
परेडची तिकिटे बुक करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाहीये. परेडचे तिकीट २० रुपयांपासून सुरू होतं.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे तिकीट २० आणि १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या नियमानुसार परेडची तिकिटे २ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत ऑनलाइन बुक करता येईल.
प्रजासत्ताक दिन परेडसाठी ऑनलाइन तिकीट बुक करायचं असेल तर संरक्षण मंत्रालयाच्या aamantran.mod.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
तिकीट बुक करण्यासाठी भारतीय आयडी, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी लागेल. तिकिटासाठी ऑनलाइन पैसे भरल्यानंतर प्रिंट आउट काढून घ्यावी.