Satish Kaushik demise
Satish Kaushik demise SAAM TV
मनोरंजन बातम्या

Satish Kaushik demise: सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर

Nandkumar Joshi

Satish Kaushik Death News : ८० च्या दशकात 'मि. इंडिया' या चित्रपटातील 'कॅलेंडर'चं पात्र दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनाच्या भिंतीवर एखाद्या फ्रेमसारखेच कोरून ठेवणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज, गुरुवारी निधन झाले. शवविच्छेदनानंतर कौशिक यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनाच्या वृत्तानं अवघं बॉलिवूड विश्व शोकसागरात बुडालं. कौशिक यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी कौशिक यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. (Latest News Update)

सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने...

सतीश कौशिक यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार, कौशिक यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्यामुळे (Cardiac Attack) झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक अहवालानुसार कौशिक यांच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नाहीत.

मुंबईत अंत्यसंस्कार होणार

शवविच्छेदन प्रक्रियेनंतर सतीश कौशिक यांचे पार्थिव शरीर मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. मुंबईत आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास वर्सोवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आदल्या रात्री काय झालं होतं, मॅनेजरनं दिली माहिती

सतीश कौशिक यांच्या मृत्यूआधी आदल्या रात्री नेमके काय झाले, याची माहिती त्यांच्या मॅनेजरनं दिली. बुधवारी रात्री साधारण ९.४० वाजता सतीश कौशिक हे झोपण्यासाठी निघून गेले. त्यानंतर साधारण १० वाजता मला फोन आला. मला अस्वस्थ वाटतंय, असं त्यांनी फोनवरून सांगितलं. मी पूर्णवेळ त्यांच्यासोबतच होतो. असं काय होईल असं वाटलं नव्हतं, असंही मॅनेजरनं सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

Maharashtra Politics 2024 : 'ठाकरेंकडून संभाजीराजे छत्रपतींचा अपमान'; व्हिडीओ दाखवून उदय सामंतांचा खळबळजनक दावा

CSK vs PBKS : पंजाबने चेन्नईला सलग चौथ्यांदा नमवलं; पंजाबचा ७ गडी राखून विजय

Petrol-Diesel : या राज्यात केवळ ५०० रुपयांपर्यंतचं भरता येणार पेट्रोल-डिझेल

SCROLL FOR NEXT