Mugdha- Prathamesh Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mugdha- Prathamesh Wedding: शुभमंगल सावधान! मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे अडकले विवाहबंधनात, लग्नाचा VIDEO व्हायरल

Mugdha- Prathamesh Marriage: पारंपारिक पद्धतीने दोघांचेही लग्न पार पडले. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्याही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate:

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (saregampa) फेम प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) - मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आज विवाहबंधनात अडकले. पारंपारिक पद्धतीने दोघांचेही लग्न पार पडले. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्याही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वी 'आमचं ठरलंय' म्हणत प्रेमाची कबुली दिली होती. गेल्या काही दिवसांपासून या कपलच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर आज त्यांचा लग्नसोहळा पार पडला. चिपळूनमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. कोणताही गाजावाजा न करता अतिशय साध्या आणि पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने मुग्धा आणि प्रथमेशने लग्न केले. दोघेही लग्नामध्ये खूपच आनंदी होते. या लग्नाच्या वेळी दोघांचेही कुटुंबीय आणि मित्र परिवाराने धम्माल केली. प्रथमेश आणि मग्धाच्या लग्नसोहळ्याचे फोटो , व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नामध्ये प्रथमेश आणि मुग्धा दोघेही खूपच क्युट दिसत होते. मुग्धाने पिवळ्या रंगाची नववारी साडी आणि प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता आणि डोक्यावर त्याच रंगाची पगडी घातली होती. त्यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत असून ते दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुग्धाच्या बहिणीचं लग्न झालं होतं. त्यानंतर आज मुग्धा विवाहबंधनात अडकली.

प्रथमेश आणि मुग्धाने काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश लघाटेने १५ जूनला आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर मुग्धासोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती. काही दिवसांपूर्वी प्रथमेश आणि मुग्धा यांनी आपआपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो पोस्ट केले होते. हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी 'वाङ्निश्चय' असं लिहिलं होतं. हे फोटो पाहून दोघांनीही गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.

दरम्यान, 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर ओळख होऊन एकमेकांना आयुष्याचा जोडीदार निवडणारी प्रथमेश आणि मुग्धा ही दुसरी जोडी आहे. यापूर्वी रोहित आणि जुईली यांची या शोच्या मंचावर भेट झाली. आधी मैत्री नंतर प्रेम असं करत दोघांनी लग्न केले. त्यानंतर आता प्रथमेश आणि मुग्धा यांची जोडी जमली असून ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आता प्रथमेश आणि मुग्धा लग्न करणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT