sara ali khan image Saam Tv
मनोरंजन बातम्या

सारा जिममधून बाहेर येताच झाली ट्रोल; पण यावेळी कारण भलतेच!

सारा अली खान सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.ते ही तिच्या कपड्यांमुळे किंवा स्टाइलमुळे नाही तर तिच्या कॅरीबॅगमुळे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान(sara ali khan) तिच्या लूक आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. मुंबईत अनेकदा तिची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कॅमेरामनची चढाओढ सुरू असते. ती स्टाइल आणि सौंदर्यासोबतच फिटनेसकडेही खूप लक्ष देते. दररोज जीममध्ये जाणे हे नित्याचेच आहे. सोशल मीडियावर(social media) तिचे चाहते नेहमीच तिचं कौतुक करत असतात. पण काही यूजर्स या ना त्या कारणावरून तिला नेहमीच ट्रोल करताना दिसतात. अलीकडेच सारा अली खान पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. पण त्याचं कारण वेगळंच होतं.

सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. कपड्यांवरून ट्रोल झालेली सारा पुन्हा एकदा ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे. यावेळी ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तेही तिच्या कपड्यांमुळे किंवा स्टाइलमुळे नाही, तर तिच्याजवळील कॅरीबॅगमुळे.

बॉलिवूड विश्वातील घडामोडींचं वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खान जांभळ्या रंगाचा टी-शर्ट, केशरी रंगाचे शॉर्ट्स, मॅचिंग स्लीपर आणि कस्टमाइज बॅगसह जिममध्ये जाताना दिसत आहे. तिने चष्मा लावला असून केस मोकळे सोडले आहेत.

साराने कॅरी केलेल्या बॅगमुळे ती ट्रोल होत आहे. साराला पाहून नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, 'सारा अली खानची बॅग रिकामी आहे आणि ती फक्त स्टाइलसाठी बॅग सोबत घेऊन फिरत आहे.' एका यूजरने म्हटले की, बॅग रिकामी आहे, पण शो-ऑफ पूर्ण करायचा आहे.' आणखी एका यूजरने लिहिले, 'रिकामी बॅग घ्यायची काय गरज होती, ती घरीच ठेवली असती, एवढा शो-ऑफ करणे बरोबर नाही.' 'आम्ही भाजी आणण्यासाठी अशा बॅग वापरतो', असे एका नेटकऱ्याने कॉमेंटमध्ये म्हटले आहे. 'हे सगळे सेलिब्रिटी रिकाम्या बॅग घेऊन का फिरत राहतात', असा उपरोधिक प्रश्न एका यूजरने केला आहे.

अलीकडेच सारा अली खान तिचे वडील सैफ अली खान आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत दिसली होती. फादर्स डेच्या निमित्ताने तिघेही जेवणासाठी एकत्र आले होते. यादरम्यान तिच्या पँटमुळेही ती खूपच ट्रोल झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा आठवा अध्याय कोणती शिकवण देतो?

Personality Traits: 'R' अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT