सध्या बॉक्स ऑफिसवर 'माँ' आणि 'मेट्रो इन दिनों' चित्रपट एकमेकांना टक्कर देताना पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपटांच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र दोघांच्या कलेक्शनमध्ये जास्त वाढ दिसत नाही. 'माँ' चित्रपटात काजोल मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर 'मेट्रो इन दिनों' सिनेमात चार वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. सध्या हे चित्रपट थिएटरमध्ये आपले मजबूत स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही चित्रपटांचे ओटीटी अपडेट जाणून घेऊयात.
'माँ' चित्रपट 27 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'माँ'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री काजोल (kajol ) मुख्य भूमिकेत दिसत आहे. 'माँ' चित्रपटात आई-मुलीची कहाणी दाखवण्यात आली आहे. यात राक्षस आणि देवी काली मातेची कथा सांगितली आहे. चित्रपटात खलनायकाची भूमिकेत रोनित रॉय दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, थिएटर गाजवल्यानंतर काजोलचा 'माँ' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'माँ' हा हॉरर ड्रामा आहे. थिएटर रिलीजच्या दोन महिन्यानंतर 'माँ' चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. असे बोले जाते की, ऑगस्टच्या अखेरपर्यंत चित्रपट ओटीटीवर पाहता येईल. मात्र अद्याप रिलीजची तारीख जाहीर झाली नाही आहे.
'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) चित्रपट 4 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो' या 2007 साली रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. 'मेट्रो इन दिनों' हा एक रोमँटिक ड्रामा आहे. चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, अली फजल, अनुपम खेर आणि नीना गुप्ता हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, थिएटर गाजवल्यानंतर 'मेट्रो इन दिनों' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. ऑगस्टच्या अखेरी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित हेणार आहे. मात्र अद्याप रिलीजची तारीख जाहीर झाली नाही आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.