Padmaavat Re Release SAAM TV
मनोरंजन बातम्या

Padmaavat Re Release: अलाउद्दीन खिलजीचा थरार अन् राजपूतची शान; मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहता येणार, कुठे अन् कधी जाणून घ्या...

Padmaavat Re Release Date : दीपिका, रणवीर आणि शाहीद कपूचा 'पद्मावत' चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 7 वर्षांनी चित्रपट पुनःप्रदर्शित होणार आहे. तारीख आताच जाणून घ्या.

Shreya Maskar

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. दीपिका आणि रणवीर सिंग यांचा 'पद्मावत' (Padmaavat ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 'पद्मावत' चित्रपट 25 जानेवारी 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील रणवीर सिंगच्या भूमिकेला चाहत्यांनी खूप प्रेम दिले.

आता पुन्हा एकदा अलाउद्दीन खिलजीचा थरार मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. 'पद्मावत' चित्रपटाची पुनःप्रदर्शित तारीख जाहीर करण्यात आली आहे. दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 'पद्मावत' चित्रपटाची कथा चित्तोडची राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यावर आधारित आहे. यावर्षी 'पद्मावत' चित्रपटाला तब्बल सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने 'पद्मावत' चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पद्मावत' चित्रपटाचे आकर्षण आलिशान सेट, भारी पोशाख आणि उत्तम डायलॉग होते. 'पद्मावत' चित्रपट अनेक वेळा वादातही सापडला आहे. 'पद्मावत'चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. यात दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर (Shahid Kapoor ) यांचा समावेश आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा बिग बजेट चित्रपट 'पद्मावत' 6 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'पद्मावत' चित्रपट आता पुन्हा किती कोटींची कमाई करणार हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. दीपिका आणि रणवीरचा मोठा चाहता वर्ग आहे. ही जोडी कायमच चाहत्यांची आवडती राहिली आहे. 'पद्मावत' चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहे. 'पद्मावत' चित्रपटाचा शेवटचा सीन पाहून आजही अंगावर काटा येतो. चाहते 'पद्मावत' पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT