Sanjay Dutt Restaurant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjay Dutt Restaurant: 'जिवंत माशांचे' कॉकटेल; संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये विचित्र मेन्यू

Sanjay Dutt Restaurant: संजय दत्तच्या मुंबईतील बारमधील एका कॉकटेलमुळे मोठा गोंधळ झाला. या कॉकटेलमध्ये एक जिवंत मासा होता. त्यामुळे प्राणी कल्याण संस्थासह अनेकांनी या कॉकटेलवर आक्षेप घेतला आहे.

Shruti Vilas Kadam

Sanjay Dutt Restaurant: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी तो त्याच्या कोणत्या चित्रपट किंवा अफेअरमुळे नाही तर त्याच्या रेस्टॉरंटमधील एक कॉकटेलमुळे चर्चेत आहे. संजय दत्त आणि त्याचा पार्टनर अभिमन्यू जाखर यांनी नुकतेच ‘अल्टा स्टेला’ नावाचे रेस्टॉरंट आणि बार सुरू केले होते. या रेस्टॉरंटच्या एका कॉकटेलमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला.

या कॉकटेलमध्ये जिवंत मासा ठेवण्यात आला होता तेवढंच नाही तर या माश्याच्यावर आग पेटवण्यात आली होती. संजय दत्तने स्वतः या कॉकटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः प्राणीप्रेमी आणि प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या प्रकारच्या कॉकटेलचा विरोध केला.

या वादानंतर रेस्टॉरंटने तातडीने ‘इबियस कॉकटेल’ नावाचे हे कॉकटेल मेनूमधून काढून टाकले. रेस्टॉरंटने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये या निर्णयाची माहिती दिली. “आम्हाला तुमची काळजी कळते, आमच्याकडून नेहमीच प्राण्यांच्याबाबत पूर्ण काळजी घेतली जाते.” असे त्यांनी स्पष्ट केले.

पोस्टमध्ये पुढे लिहीले की, 'एबिसु कॉकटेल' या कॉकटेलची संकल्पना मीन राशीपासून प्रेरित आहे. बेटा फिश हे फायटर फिश म्हणूनही ओळखलं जातं. बेटा फिश हे तळातूनही श्वास घेऊ शकतात.पण कॉकटेलमध्ये जिवंत माशाबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळेच आम्ही हे ड्रिंक यापुढे सर्व्ह न करण्याचा निर्णय घेतला आहे'

दरम्यान, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती. अनेक युजर्सनी जिवंत प्राण्यांचा अशा प्रकारे वापर करणे अयोग्य असल्याचे म्हटले. काहींनी तर संजय दत्त यांना थेट प्रश्नही विचारले. या घटनेनंतर पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनी जाहिराती आणि प्रमोशन करताना सामाजिक जबाबदारी लक्षात घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT