Shruti Vilas Kadam
अनन्या पांडेने ‘कॉल मी बे २’ या वेब सिरीजचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली.
शूटिंग संपल्याचा आनंद साजरा करत तिने सेटवरील काही खास फोटो शेअर करत “लवकरच भेटू” असा टेस्ट चाहत्यांना दिला.
या सिरीजमध्ये अनन्या पुन्हा एकदा स्टायलिश ‘बे’च्या भूमिकेत दिसणार असून तिच्या आयुष्यातील नव्या आव्हानांची झलक पाहायला मिळणार आहे.
दुसऱ्या सीझनमध्ये तिच्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत अधिक ठळकपणे मांडली जाणार आहे.
यावेळी सिरीजमध्ये श्रुती हसन हिची एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
‘कॉल मी बे २’ ही सिरीज प्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या प्रॉडक्शनखाली तयार होत आहे.
पहिल्या सीझनला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर दुसऱ्या सीझनमध्ये अधिक ड्रामा, ट्विस्ट आणि मनोरंजनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.