Sanjay Dutt Shot By Licensed Gun To His Maid Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjay Dutt Birthday : संजय दत्तने घरातल्या मोलकरणीवरच चालवली होती गोळी; वाचा त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

Sanjay Dutt Shot By Licensed Gun To His Maid : संजय दत्तला त्याच्या बालपणी खेळण्यातल्या बंदुकीसोबत खेळण्याची खूप आवड होती. पण त्याला त्याचा हा खेळ एक दिवशी अंगलट आला होता.

Chetan Bodke

बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ म्हणजेच अभिनेता संजय दत्तचा आज (२९ जुलै) ६५ वा वाढदिवस आहे. संजय दत्तचा ‘नायक’ ते ‘खलनायक’ प्रवास सर्वांनीच अगदी डोळ्यासमोर पाहिला आहे. संजु बाबाने ‘रॉकी’ चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत डेब्यू केले आहे. पण त्याला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधून ओळख मिळाली. संजय दत्त जितका त्याच्या फिल्मी करियरमुळे चर्चेत राहिला, त्यापेक्षा जास्त तो त्याच्या रियल लाईफमुळे चर्चेत राहिला. आज आपण संजु बाबाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यासंबंधित काही किस्से जाणून घेणार आहोत.

संजय दत्तला त्याच्या बालपणी खेळण्यातल्या बंदुकीसोबत खेळण्याची खूप आवड होती. पण त्याला त्याचा हा खेळ एक दिवशी अंगलट आला होता. संजय दत्तच्या फॅमिलीतील एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, संजयला लहानपणी त्याच्या हातात वडिलांची खरी लायसन्सची बंदूक हाती लागली होती. ती बंदूक खेळण्याच्या तंदरीत अभिनेत्याने चुकून त्यांच्या मोलकरणीवर गोळी झाडली आणि ती गंभीर जखमी झाली. नंतर संजयच्या कुटुंबीयांनी मोलकरणीवर उपचार करून संपूर्ण प्रकरण तिथेच दाबून ठेवले.

संजय दत्तला प्रचंड ड्रग्सचे व्यसन लागले होते. एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने खुलासा केला होता की, तो फार कमी वयातच ड्रग्जच्या आहारी गेला होता. त्याला ड्रग्जचे खूप व्यसन लागले होते. एकदा तर ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे, संजय सलग दोन दिवस झोपून राहिला होता. आपल्या समोर काय चालू आहे ? आपण काय करतोय ? याची त्याला साधी सुदही नव्हती. २ दिवसानंतर संजयला जाग आल्यानंतर त्यांच्या घरात काम करणारा नोकर त्याला पाहून रडू लागला होता.

रडत रडत तो म्हणतो, संजय बाबा तुम्ही २ दिवसानंतर उठले आहेत. हे ऐकून स्वत: अभिनेता चिंतेत आला. त्याला जाणीव झाली की, जर आपण आत्ताच ड्रग्जचे सेवन करण्याची सवय सोडली नाही तर, आपण लवकरच मृत्यूच्या दाढीत जाऊ शकतो. नंतर स्वत: संजयने आपल्या वडिलांना ड्रग्जचे सेवन केल्याचे सांगितले. आपल्या लेकाची ही सवय लवकरात सुटावी यासाठी त्यांनी त्याला अमेरिकेतील प्रसिद्ध व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले.

संजय दत्त शेवटचा 'डबल इस्मार्ट' चित्रपटात दिसला होता. त्याशिवाय संजय किंग खानच्या 'जवान' आणि थलापती विजयच्या 'लियो' चित्रपटातही दिसला होता. त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. संजय दत्तला त्याच्या फिल्मी करियरमध्ये फिल्मफेअर पुरस्कारापासून ग्लोबल इंडियन फिल्म अवॉर्डपर्यंत अनेक पुरस्कार पटकावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT