Beed News: व्यसनमुक्तीसाठी तरुणाई एकवटली! शिवसंग्रामकडून बीडमध्ये व्यसनमुक्ती रॅली; शेकडो तरुण-तरुणींचा सहभाग

Beed Latest News: बीड शहरात व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. व्यसनमुक्तीचा नारा देत निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण, तरुणींसह बीडकर सहभागी झाले होते .
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On

Beed Breaking News:

नववर्ष सुरू व्हायला अवघे दोन दिवस उरलेत. नववर्षाचं स्वागत म्हणलं की पार्टी, डान्स अन् धागडधिंगा घालण्याकडे तरुणाईचा कल असतो. याच पार्श्वभूमीवर व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी बीड शहरात व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. व्यसनमुक्तीचा नारा देत निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण, तरुणींसह बीडकर सहभागी झाले होते .

आमदार स्वर्गीय विनायकरावजी मेटे (Vinayak Mete) यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्ती रॅली प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येते आहे. यंदा शिवसंग्रामच्या (Shivsangram) सर्वेसर्वा डॉ. ज्योती विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीला सुरुवात करण्यात आली.

आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख ओम प्रकाश शेटे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. तसेच निरोगी आयुष्यासाठी व्यसनमुक्त रहा, असे आवाहन करण्यात आले..

Beed News
Jalana News: 'देवेंद्र फडणवीस गो बॅक...' जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक; काळे झेंडे दाखवत ताफा अडवण्याचा प्रयत्न

दरम्यान या रॅलीला बीड शहरातील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रीडा संकुलावरून सुरुवात होऊन.. सुभाष रोड-माळवेस चौक- कारंजा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-मार्गे सामाजिक न्याय भवनात समारोप झाला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण, तरुणींसह बीडकर सहभागी झाले होते. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
IMD Rain Alert: पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'या' राज्यांना अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com