राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून याचा फटका राजकीय दौऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आज जालना दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा बांधवांनी केला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे 'वंदे भारत एक्सप्रेस'च्या (Vande Bharat Express) उद्घाटनासाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बदलापूर शहरात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दिसताच त्याला काळे झेंडे दाखवले.
तसेच 'देवेंद्र फडणवीस गो बॅक'च्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना अडवले. याप्रकरणी पोलिसांनी बदलापूर (Badalapur) शहरातून चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
जालना रेल्वे स्थानकावर आज जालना ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री रावसाहेब दानवे, अतुल सावे तसेच जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी जालना रेल्वे स्थानकात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.