ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल कमी वयात मुलांना खराब सवयी लागतात.
धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर काही खाद्यपदार्थ आहेत जे तुम्हाला तुमच्या व्यसनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात.
दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर असतात. ज्यामुळे तुमची सिगारेट ओढण्याची इच्छा कमी होते.
फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास आणि सिगारेटचे हानिकारक प्रभाव कमी करण्यास मदत करतात.
ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन नावाचा घटकदेखील धूम्रपानामुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करू शकतो.
पाणी तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासह धूम्रपानाचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करते. धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करत असताना भरपूर पाणी प्या.
नट्स आणि बिया हे प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबरचे चांगले स्त्रोत आहेत. जे सिगारेट ओढण्याची तुमची इच्छा कमी करतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.