ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतील रेल्वे नेटवर्क जगात चौथ्या क्रमांकावर येते. येथे 11 हजाराहून अधिक ट्रेन दररोज धावतात.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेपेक्षा अधिक फायदेशीर आणि सुरक्षित वाहन नाही.
पण तुम्हाला माहित आहे का, की भारतात एक असे स्टेशन आहे जिथून एकही ट्रेन येत-जात नाही.
बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले 'सिंगाबाद' हे भारतातील शेवटचे स्टेशन आहे.
सिंगाबाद स्टेशन बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात येते.
येथील सिग्नल, टेलिफोन, तिकीट बूथ ही उपकरणे ब्रिटिशकालीन आहेत.
येथे पूर्वी भारतातील कोलकाता आणि ढाका दरम्यान कनेक्टिव्हिटी होती. येथील बोर्डवर लिहिले आहे की, भारताचे शेवटचे स्टेशन.
आता नेपाळ आणि तेथून भारतात येणाऱ्या मालगाड्या या स्टेशनवरून जातात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.