Ashok Saraf And Rutuja Bagwe Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangeet Natak Academy Awards: अशोक सराफ आणि ऋतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर, होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Ashok Saraf And Rutuja Bagwe: संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. यंदा संगीत नाटक अकादमीतर्फे विविध क्षेत्रातील ९२ कलाकारांच्या नावाची पुरस्कारासाठी (Sangeet Natak Academy Awards) घोषणा करण्यात आली आहे.

Priya More

Sangeet Natak Academy Awards 2024:

संगीत नाटक अकादमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. यंदा संगीत नाटक अकादमीतर्फे विविध क्षेत्रातील ९२ कलाकारांच्या नावाची पुरस्कारासाठी (Sangeet Natak Academy Awards) घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf), अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) यांच्या नावाचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. संगीत नाटक अकादमीतर्फे कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. मंगळवारी रात्री उशिरा पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.

मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या आनंदामध्ये आता आणखी भर पडली आहे. अशोक सराफ यांना आता संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री ऋतुजा बागवेला अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ऋतुजानं संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. सध्या या दोघांवर देखील शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. संगीत, नृत्य अभिनय इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य, संगीत, अभिनय आणि कठपुतळी यांतील योगदानांबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी -

- अशोक सराफ, अभिनय

- विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक

- कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत

- नंदिनी परब गुजर, सुगम संगीत

- सिद्धी उपाध्ये, अभिनय

- महेश सातारकर, लोकनृत्य

- प्रमिला सूर्यवंशी, लावणी

- अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक

- सारंग कुलकर्णी, सरोद वादक

- नागेश आडगावकर, अभंग संगीत

- ऋतुजा बागवे, अभिनय

- प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चिंचवडमध्ये मॉलजवळ मोठी आग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

Divya Deshmukh : 'बुद्धीबळाची राणी' दिव्यावर पैशांचा वर्षाव; 'वर्ल्ड चॅम्पियन'ला किती रक्कम मिळाली? वाचा

SCROLL FOR NEXT