Shubhangi Sadavarte Divorce SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shubhangi Sadavarte Divorce : मराठमोळ्या अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नाच्या ५ वर्षांनी पतीपासून विभक्त

Shubhangi Sadavarte-Anand Oak Divorce : 'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने घटस्फोट घेतला आहे. त्याबद्दल अभिनेत्रीच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने घटस्फोट घेतला आहे.

शुभांगीच्या नवऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट करून घटस्फोटाची माहिती दिली आहे.

लग्नाच्या ५ वर्षांनी शुभांगी-आनंद विभक्त झाले आहेत.

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठमोळी अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. ज्याची माहिती तिच्या नवऱ्याने चाहत्यांना दिली आहे. 'संगीत देवभाबळी' (sangeet devbabhali) फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचा (Shubhangi Sadavarte) घटस्फोट झाला आहे. 'संगीत देवभाबळी' नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. शुभांगी सदावर्तेच्या नवऱ्याचे नाव आनंद ओक (Anand Oak ) आहे. ते लग्नाच्या पाच वर्षांनी विभक्त झाले आहेत.

घटस्फोटासंदर्भात आनंद ओकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शुभांगी आणि आनंदने 2020मध्ये लग्न बंधनात अडकले. आनंद ओकच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहेत. चाहते त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. शुभांगी आणि आनंद यांनी करोना काळात लग्नगाठ बांधली. आनंद ओकने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं, जाणून घेऊयात.

आनंद ओक पोस्ट

"प्रिय मित्रांनो,

शुभांगी आणि मी काही वर्षांपूर्वी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय स्वीकारण्यास आम्हाला थोडा वेळ लागला. आता हा निर्णय सांगण्यासाठी योग्य क्षण वाटतो आहे. आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल आणि आम्ही एकत्र चाललेल्या प्रवासाबद्दल मी आभारी आहे. मी शुभांगीला भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. ती एक उत्तम अभिनेत्री आणि व्यक्ती आहे. भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही एकत्र काम करत राहू..."

'संगीत देवबाभळी' नाटक

सध्या 'संगीत देवबाभळी' हे नाटक हाऊसफुल पाहायला मिळत आहे. या नाटकात शुभांगी सदावर्तेने आवलीची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. शुभांगी सदावर्तेने 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात झळकली होती. तसेच तिची 'नवे लक्ष्य' ही पोलिसांची मालिका खूप गाजली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC: मनसेच्या अटी ठाकरे सेनेकडून मान्य; संजय राऊत-राज ठाकरे यांची 25 मिनिटे चर्चा; बैठकीत काय- काय ठरलं?

Maharashtra Live News Update: बदलापूर स्त्री बीज प्रकरणातील सहावा डॉक्टर आरोपी अटक

Chhatrapati Shivaji Maharaj fort: समुद्रासमोर सिंधुदुर्ग किल्ला ताठ उभा राहण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोणती युगत मांडली?

मालेगाव महापालिकेच्या महासभेत राडा; MIM आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी, एकमेकांच्या अंगावर आले धावून|VIDEO

Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार

SCROLL FOR NEXT