Sana Khan Became Mother Instagram @sanakhaan21
मनोरंजन बातम्या

Sana Khan Became Mother: सना खान झाली आई; गोंडस बाळाला दिला जन्म, खास पोस्ट करत म्हणाली...

Sana Khan Mother: दीपिका कक्कर आणि गौहर खाननंतर आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

Chetan Bodke

Sana Khan Give Birth To Baby Boy: बॉलिवूडमधून एक गुड न्यूज समोर येत आहे. दीपिका कक्कर आणि गौहर खाननंतर आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. बॉलिवूडमध्ये आणखी एका कपलने चाहत्यांना गुड न्यूज देत, आश्चर्याचा धक्का दिला आहे. बॉलिवूडमधून बाहेर पडलेली बिग बॉस फेम अभिनेत्री सना खान (Sana Khan) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

बिग बॉस फेम सना खानने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सना खान आणि अनस सैयद आता आई वडील झाले आहेत. गेले कित्येक दिवस ते ज्या आनंदाची वाट पाहत होते तो दिवस अखेर आला आहे. सनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

सना खानने काही महिन्यांपूर्वीच ती गरोदर असल्याची माहिती दिली होती. तिने ही गोड बातमी सोशल मीडियावरून शेअर केली आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये सनाने लिहिले, 'अल्लाहने आम्हाला आमच्या बाळासाठी सर्वोत्तम पालक बनवावं. अल्लाहची भेट आहे चांगलं बनायचंय. तुम्ही आमच्या या संपूर्ण प्रवासात आमच्या सोबत राहिलात आणि आमच्यासाठी, आमच्या बाळासाठी प्रार्थना केली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही तुमचे आभारी आहोत.'

सना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे आणि पतीचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आई झाल्याची बातमी सनाने एका व्हिडीओतून दिली आहे. टेलिव्हिजन अभिनेत्रीने ॲनिमेटेड व्हिडीओतून बातमी शेअर करत, देवाचे आभारही मानले. तसेच शुभेच्छांसाठी तिने तिच्या फॅन्सला धन्यवाद देखील दिले आहेत.

अभिनेत्री सना खानला मनोरंजन विश्वातील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस चेहरा मानला जातो, ती टेलिव्हिजनसृष्टीत, सिनेसृष्टीत आणि ओटीटी विश्वातही सक्रिय होती. 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले होते, 'स्पेशल ऑप्स' या वेबसीरिजमधील तिची भूमिका सर्वांनाच भावली. 2020 मध्ये जेव्हा तिने अचानक मनोरंजनसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT