Samir Choughule Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

Samir Choughule: समीर चौघुलेच्या प्रमुख भूमिकेतील ‘साखर खाल्लेला माणूस’ हा कौटुंबिक मराठी चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. नात्यांचा गोडवा उलगडणाऱ्या कथेबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Shruti Vilas Kadam

Samir Choughule: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता समीर चौघुले पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि कौटुंबिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साखर खाल्लेला माणूस’ या नव्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून हा चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर समीर चौघुलेच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अंगणात उभारलेली गुढी, कौलारू घर आणि निसर्गरम्य वातावरणातून नातेसंबंधांचा गोडवा आणि कौटुंबिक भावना अधोरेखित करण्यात आल्या आहेत. पोस्टरवरूनच हा चित्रपट कुटुंब, नाती आणि माणुसकीभोवती फिरणारी हृदयस्पर्शी कथा मांडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

समीर चौघुले यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, अभिनेता अजिंक्य राऊत, अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि नील सालेकर यांसारखे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. विविध पिढ्यांतील कलाकारांची ही दमदार फळी चित्रपटाला अधिक समृद्ध बनवणार आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंदिरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी संहिता ठेवून करण्यात आली. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने बाप्पाचे आशीर्वाद घेत नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

एबीसी क्रिएशन आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. आशिष अग्रवाल आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत, तर ऋत्वी तावडे सहनिर्माती म्हणून कार्यरत आहेत. चित्रपटाचे लेखन विद्यासागर अध्यापक यांनी केले असून दिग्दर्शनाची जबाबदारी पांडुरंग कृष्णा जाधव यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक पांडुरंग कृष्णा जाधव यांनी सांगितले की, ‘साखर खाल्लेला माणूस’ ही केवळ एका व्यक्तीची कथा नसून प्रत्येकाच्या आयुष्यातील नात्यांचा गोडवा जपणारी गोष्ट आहे. प्रेक्षकांना हसवणारा, भावूक करणारा आणि कुटुंबासोबत पाहता येईल असा हा चित्रपट असल्याचे त्यांनी नमूद केले.गुढीपाडव्याच्या शुभ पर्वावर प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक मनोरंजक आणि भावनिक अनुभव देणार आहे. समीर चौघुलेच्या अभिनयासह नात्यांचा गोडवा उलगडणारी कथा पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT