Samay Raina on Amitabh Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: पोलिओची जाहिरात करता, पण मुलाला पायावर उभं केलं नाही; समय रैनाकडून अमिताभ बच्चन यांचा अपमान

Samay Raina on Amitabh Bachchan: समय रैनाने त्याचा 'Still Alive' हा शो सुरू केला आहे. या निमित्ताने त्याने अमिताभ बच्चन यांना 'रोस्ट' करण्याची संधी साधली. समय रैनाने नेमकं काय म्हटलं आहे, हे जाणून घेऊयात.

Shruti Vilas Kadam

Samay Raina on Amitabh Bachchan: प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना त्याच्या लेटेंट शोमुळे झालेल्या वादानंतर सतत चर्चेत आहे. त्याला त्यानंतर अनेक कठीण अडचणींचा सामना करावा लागला. पण आता समयने पुन्हा स्वत:च्या पायावर धोंडा मारणार वक्तव्य केलं आहे. त्यांचे त्याच्या एका शोमध्ये बीग बि म्हणजेच अमिताभ बच्चन यांची मस्करी करताना अपमान केला आहे. हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याच्या अशा बोलण्याने चाहते नाराज आहेत.

प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाने त्याच्या 'Still Alive' या शोमध्ये कौन बनेगा करोड़पती(KBC) या लोकप्रिय शोबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या वेळेस आपण खोटं बोललो होतो, अशी कबुली समयने नुकतीच दिली असून, यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

खोटा किस्सा सांगितला

समय रैनाने सांगितले की, KBCच्या मंचावर ‘हॉट सीट’वर बसलेला असताना त्याने एक इमोशनल किस्सा सांगितला. त्याने सांगितले होते, त्याची आजी अमिताभ बच्चन यांची खूप मोठी चाहती होती. मात्र, आता त्याने स्पष्ट केले की हा खोटा किस्सा होता. तो म्हणाला, मी बिंग बींना KBCमध्ये विचारणार होतो 'तुम्ही पोलिओ मोहिमेसाठी इतक्या जाहिराती करता, मग स्वतःच्या मुलाला पायावर उभं का करू शकला नाही?' पण त्याजागी मी म्हणालो माझी आजी तुमची खूप मोठी फॅन आहे. पण माझी आजी हयातच नाही, तिच्या निधनाला सात वर्षे झाली आहेत. ते विधान मी केवळ खेळाची रंगत वाढवण्यासाठी केले होते,” असे तो म्हणाला.

'याने तर खरोखरच काहीतरी खूप मोठं करून दाखवलंय!'

समय रैना पुढे म्हणाल, 'अमिताभ सर ट्विटरवर खूप सक्रिय असतात. त्यांना मी खूप आवडलो होतो. मी त्यांच्यावर खूपच सकारात्मक छाप पाडली होती. पण जेव्हा त्यांनी मला टीव्हीवरील बातम्यांमध्ये पाहिलं, तेव्हा त्यांच्या मनात आलेला पहिला विचार हाच असावा, 'अरे व्वा! याने तर खरोखरच काहीतरी मोठं काम केलं आहे. कदाचित याला 'परमवीर चक्र' सुद्धा मिळालं असावं!'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- उद्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

SCROLL FOR NEXT