Samay Raina And Ranveer Allahbadia India’s Got Latent controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

India’s Got Latent: समय रैना आणि रणवीर अलाहबादियाची पोलिसांसमोर हजेरी? 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या 'त्या' एपिसोडमुळे कॉमेडियनच्या अडचणीत वाढ

India’s Got Latent controversy: मुंबई पोलिसांनी समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्याशी संपर्क साधला आहे. पोलिसांनी त्यांना इंडियाज गॉट लेटेंट वादात सहकार्य करण्यास सांगितले आहे.

Shruti Vilas Kadam

India’s Got Latent: मुंबई पोलिसांनी समय रैना आणि रणवीर अलाहबादिया यांच्याशी संपर्क साधला आहे. पोलिसांनी त्यांना इंडियाज गॉट लेटेंट वादात सहकार्य करण्यास आणि तपास अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी शोच्या आयोजकांकडून इंडियाज गॉट लेटेंटचे मूळ फुटेज मागितले आहे. पोलिसांनी आयोजकांकडून एपिसोडचे संपूर्ण फुटेज, अनकट व्हिडिओ आणि मूळ स्क्रिप्ट मागितली आहे.

हा सर्व प्रकार नेमका काय आहे

यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया, ज्याला बीअरबायसेप्स म्हणून ओळखले जाते, तो स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैनाच्या शो, इंडियाज गॉट लेटेंटमध्ये उपस्थित असताना केलेल्या अयोग्य टिप्पणीनंतर वादाच्या केंद्रस्थानी सापडला आहे. शो दरम्यान, रणवीरने एका स्पर्धकाला अपमानास्पद प्रश्न विचारला तो म्हणाला "तू तुझ्या पालकांना आयुष्यभर शारीरिक संबंध ठेवताना पाहू शकतोस का? किंवा तू त्यांच्यात एकदा सामील होऊन ते कायमचे थांबवशील का?

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

या टिप्पणीला प्रेक्षकांकडून लगेचच तीव्र प्रतिक्रिया मिळाल्या, त्यांनी ती असभ्य आणि अयोग्य असल्याची टीका केली. पत्रकार आणि लेखक नीलेश मिश्रा यांनीही X (पूर्वीचे ट्विटर) वर नापसंती व्यक्त केली, त्या क्षणाची एक क्लिप शेअर केली आणि लिहिले, "आपल्या देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या विकृत क्रिएटर आहेत हे. मला खात्री आहे की प्रत्येकाचे लाखो फॉलोअर्स आहेत. पण लहान मुलांनी असे कन्टेन्ट पाहणे योग्य नाही. निर्मात्यांना याची जाणीव असली पाहिजे."

रणवीरची माफी

वादानंतर, रणवीरने एक विधान जारी करत म्हणाला, “माझी टिप्पणी ही अनुचित नव्हती, मला विनोद करता येत नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. तुम्हापैकी अनेकांनी विचारले होते की मी माझ्या प्लॅटफॉर्मचा वापर अशा प्रकारे करू इच्छितो का आणि अर्थातच मी ते अशा प्रकारे वापरू इच्छित नाही. जे काही घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ किंवा तर्क देणार नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. असे म्हणत रणवीरने झालेल्या प्रकारची माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT