Samantha Ruth Prabhu Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Tweet: तो ज्या मुलींना डेट करेल ती रडेल.. नागा चैत्यनच्या रिलेशनशिपविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर सामंथाने सोडले मौन

Samantha On Naga Chaitanya: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाविषयी बातमी समांथापर्यंत पोहोचली.

Pooja Dange

Samantha On Naga Chaitanya's Dating rumors: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा तिच्या शाकुंतलम या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. दरम्यान समांथाविषयी एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. या बातमीत असे सांगण्यात आले की, समांथाने एका मुलाखतीत नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. या सर्व गोष्टी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बातमीत लिहिल्या गेल्या होत्या.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाविषयी ही बातमी समांथापर्यंत पोहोचली. या बातमीवर समांथाने लगेच ट्विट केले की, मी कोणत्याही मुलाखतीत असे काहीही बोलले नव्हते.

GreatAndhra.com या तेलुगु वेबसाईटवर समांथाची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत असे लिहिले आहे की, समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समांथाने याविषयी चर्चा केली आहे.

सूत्रांकडून समांथाचा हवाला देत असे लिहिले होते, "कोण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याची मला अजिबात चिंता नाही. ज्यांना प्रेमाची किंमत नाही, ते रडतील. तो कितीही मुलींना डेट करतो हे महत्त्वाचे नाही. फक्त ती मुलगी आनंदी असावी. जर त्याने (नागा चैतन्य) आपली वागणूक सुधारली आणि मुलीची काळजी घेतली, तिला दुखावले नाही तर ते सर्वांसाठी चांगले होईल."

ही बातमी ट्विटरवर शेअर करत समांथाने लिहिले- "मी असे कधीच बोलले नाही!!"

नागा चैतन्य हा तेलुगू अभिनेता नागार्जुनचा मुलगा आहे. समांथा आणि नागा चैतन्य यांचे 6 ऑक्टोबर 2017 रोजी लग्न झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

समांथा 'यशोदा' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट हिट ठरला होता. आता तिचा नवा चित्रपट 'शाकुंतलम' येत आहे. गुणशेखर दिग्दर्शित या चित्रपटात समांथासोबत देव मोहन दिसणार आहे. अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हा देखील या चित्रपटात एक छोटी भूमिका करत आहे. 'शाकुंतलम' 14 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT