Samantha Ruth Prabhu Yandex
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu: लोकप्रिय सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री समंथा टॉपवर

Samantha Ruth Prabhu tops IMDB Poularity List: समंथा रुथ प्रभू ही लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समंथा रुथ प्रभू ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. नागा चैतन्यासोबतचा घटस्फोट हा तिच्या संपूर्ण करिअरपेक्षा जास्त चर्चेत राहीला. घटस्फोटानंतर समंथाने अनेक नवीन प्रोजेक्टस केले. आपल्या करिअरमध्ये समंथाने पहिलाच आयटम सॅान्ग केला. दक्षिणेची अभिनेत्री समंथा ला 'ऊ अंटावा' या गाण्यानंतर अजून ओळख मिळाली. तसेच अॅमेजॅानच्या 'द फॅमिली मॅन' वेब सीरीजमध्ये आपण किती कौशल्यबद्ध कलाकार आहोत हे तिने सिद्ध करुन दाखवले.

अॅमेजॅानवर नुकताच रिलीज झालेल्या 'सिटाडेल: हनी बनी'या वेब सीरीज मध्ये समंथा रुथ प्रभू झळकली. या वेब सीरीज मध्ये वरुण धवन आणि समंथा मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सीरीज रिलीज होताच काही काळातच हीट झाली. प्रेक्षकांना ही सीरीज खूप आवडली . या सीरीजमुळे समंथाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षक सुद्धा तिच्या कामाशी परिचित झाले आहेत. याच वेब सीरीजनंतर समंथाने IMDBच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

सिटाडेल: हनी बनी या वेब सीरीजच्या रिलीजनंतर समंथा आणि वरुण धवन IMBDच्या लोकप्रिय कलाकारांच्या यादीत समावेश झाला आहे. समंथा रुथ प्रभू ही पहिल्या क्रमांकावर असून वर असून वरुण धवन हा २५व्या स्थानावर आहे.या शिवाय नुकताच रिलीज झालेल्या भूल भूलैया ३ने बॅाक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. या सिनेमातले कलाकारांनी सुद्धा IMDbच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत आपले स्थान निश्चिच केले आहे.

कार्तिक आर्यन हा १४व्या स्थानावर आहे तर बॅालिवूड मधला आपल्या दमदार कामगिरीनंतर तृप्ती डिमरी ही ५व्या स्थानावर आहे. तसेच भूल भूलैया ३ मध्ये कमबॅक करणारी विद्या बालन ही ३५व्या स्थानावर आहे.

नेटफ्लिक्स सीरीज 'द बकिंघम पॅलेस'मध्ये दमदार अभिनयाने करीना कपूरने चाहत्यांची मने जिंकली होती. या वेब सारीजमुळे करीना कपूर १०व्या स्थानावर आहे. तर दीपिका पादुकोण ही ९व्या स्थानावर आहे. बॅालिवूड किंग खान हा तिसऱ्या स्थानावर आहे.

Edited by: Priyanka Mundinkeri

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT