Samantha Ruth Prabhu Movie Yashodha 
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu Movie: प्रदर्शनापूर्वीच समंथाच्या 'यशोदा' चित्रपटाने केली ५५ कोटींची कमाई

सोशल मीडियावर प्रत्येकजण यशोदाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yashoda Movie Review: साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभूचा बहुप्रतिक्षित 'यशोदा' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच 'यशोदा' या चित्रपटाने लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच जवळपास 55 कोटींची कमाई केली होती. त्याचबरोबर सोशल मीडियावर येणाऱ्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असे दिसत आहे.

हरी-हरीश दिग्दर्शित या चित्रपटात समंथा रुथ सरोगेट मदरच्या भूमिकेत दिसत आहे. या सस्पेन्स अॅक्शन थ्रिलर चित्रपटातील अभिनेत्री समंथाचा हा दमदार अवतार लोकांना आवडला आहे. थिएटर असो किंवा ट्विटर, सोशल मीडियावर प्रत्येकजण यशोदाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. यशोदाच्या माध्यमातून समंथा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे. (Social Media)

चित्रपट पाहून ट्विटरवर एका युजने लिहिले आहे की, 'पहिला हाफ अधिक प्रभावी आहे पण दुसरा भावनिक आहे.' तर दुसर्‍या युजरने लिहिले की, 'सामंथाचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय... चित्रपटात ट्विस्ट आणि टर्न्स आहेत.. जबरदस्त चित्रपट.'

चित्रपटात समंथासोबत उन्नी मुकुंदन, वरलक्ष्मी सरथकुमार, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, राजीव कुमार अनेजा, शत्रु, मधुरिमा, दिव्या श्रीपदा, कल्पिका गणेश महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. (Actors)

समंथा रुथ प्रभू सध्या अमेरिकेत आहेत. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. इंस्टाग्राम पोस्टमद्वारे समंथाने तिला मायोसिटिस नावाचा आजार झाला असल्याचे सांगितले होते. हे समजताच तिचा एक्स-हसबँड नागा चैतन्य याने देखील तिची विचारपूस केली. (Samantha)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

SCROLL FOR NEXT