Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Release Date: बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून प्रेक्षकांचे भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी सलमानने त्याच्या या चित्रपटाची घोषणा केली होती. सलमान खानचे चाहते 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. नुकतीच सलमानने त्याच्या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. सलमान खानने त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टीझर कधी रिलीज होणार हे सांगितले आहे.
दिग्गज अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाशी संबंधित त्याचा नवीन लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये सलमान खान मोठ्या केसांमध्ये दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील रुबाब फोटो पाहताच दिसत आहे. या पोस्टरसोबत टीझरच्या रिलीजची माहिती देत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आता 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचा टीझर पाहा.' या चित्रपटाशी संबंधित सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'किसी का भाई किसी की जान' चा टीझर शाहरुख खानच्या 'पठान' या चित्रपटासोबत मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार असल्याचे सलमानच्या कॅप्शनवरून स्पष्ट झाले आहे. सलमान खानचे चाहते पोस्टवर कमेंट करून आनंद व्यक्त करत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, राघव जुयाल, व्यंकटेश आणि जगत्पती बाबू यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.