Salman Khan Build New Hotel In Mumbai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan New Hotel: भाईजानचा नवा उद्योग; मुंबईत बांधणार १९ मजली अलिशान हॉटेल

Salman Khan Build New Hotel In Mumbai: सलमान लवकरच आणखी एक नवा उद्योग सुरू असणार असून मुंबईतील वांद्र्यात कार्टर रोडवर सलमान अलिशान हॉटेल बांधणार आहे.

Chetan Bodke

Salman Khan Build New Hotel: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून कमालीचा चर्चेत आहे. कधी खासगी आयुष्यातील येणाऱ्या अडचणींमुळे तर कधी व्यावसायिक जीवनामुळे चर्चेत राहिला आहे. आता यावेळी तो चर्चेत येण्याचं कारण देखील असंच काहीसं आहे. मुंबईतील वांद्र्यातील कार्टर रोडवर सलमान १९ मजली अलिशान हॉटेल बांधणार असल्याची माहिती मिळत आहे. भाईजानच्या या १९ मजली हॉटेलबद्दल त्याच्या सर्वच चाहत्यांना उत्सुकता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान वांद्र्याच्या कार्टर रोडवर १९ मजली इमारतीचे हॉटेल बांधणार असून त्याचे हे नवीन हॉटेल सी-फेसिंग असणार आहे. मुंबई महानगरपालिकेने त्याच्या या हॉटेलच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचंही मीडिया रिपोर्टमध्ये नमूद केलंय. सलमानच्या या १९ मजली हॉटेलला त्याच्या आईचं नाव अर्थात सलमा खान यांच्या नावावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.

सलमानच्या १९ मजली हॉटेलची उंची ६९.९ मीटर इतकी असून त्याचा वापर व्यावसायिक हेतूसाठीच केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सुसज्ज कॅफे आणि रेस्टॉरंट असेल. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असेल. तर चौथा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी असेल. तर पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर असेल. यानंतर ७व्या मजल्यापासून ते १९व्या मजल्यापर्यंत अलिशान हॉटेल असणार आहे.

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की, त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी गुंतवणूक करायला आवडते. आता खान कुटुंबीय मुंबईतील वांद्र्यातील कार्टर रोडवर १९ मजली अलिशान हॉटेल बांधणार आहेत. त्या परिसरात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे घर आहेत. त्यामुळे सलमानचा हा नवीन बिझनेस पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT