Salman Khan News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan News: आधी ५ कोटींची खंडणी मागितली; अटक केल्यावर म्हणतो, चुकून मेसेज आला, सलमान-बिश्नोईचा वाद मिटवतो!

Salman Khan Threaten Massage : वाहतूक पोलिसांना मॅसेज करणाऱ्या व्यक्तीने चूक मान्य करत माफी मागितली आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मागील अनेक दिवसांपासून सलमान खानला संपवण्याच्या मॅसेज येत आहेत. अलिकडेच पोलिसांच्या नंबरवर सलमान खानला धमकावण्याचा मॅसेज आला होता. या मॅसेजमध्ये सलमान खानची अवस्था राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्यापेक्षाही वाईट होईल असे म्हटले होते. दरम्यान आता याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.

पोलिसांना ज्या नंबरवरून मॅसेज आला त्या व्यक्तीने माफी मागितली आहे. त्या व्यक्तीने चुकून मॅसेज पाठवल्याचे सांगितले आहे. सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई हा वाद खूप जुना आहे. यामुळे यानावे सलमान सतत धमक्या येत असतात. नुकतंच वाहतूक पोलिसांना मॅसेज करणाऱ्या व्यक्तीने चूक मान्य करत माफी मागितली आहे.

वाहतूक पोलिसांना आलेल्या मॅसेजनुसार, अभिनेत्याला मारण्याची धमकी आणि ५ कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. जर सलमानने पैसे दिले नाही तर त्याला संपवण्यात येईल असा मॅसेज होता. हा मॅसेज येण्याच्या दोन दिवसांपूर्वी सलमान खानचे निकटवर्तीय, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांची हत्या झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली होती. यानुसार सलमानने मागितलेली रक्कम दिल्यास सलमानचे बिश्नोईसोबतचे वैर संपवू असे त्यात म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT