Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : विवियनच्या समोर आला शिल्पाचा खरा चेहरा, म्हणाला...

Vivian Dsena-Shilpa Shirodkar Fight : बिग बॉसच्या घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. आता विवियन डिसेनाच्या समोर शिल्पा शिरोडकरचा खरा चेहरा आला आहे. विवियन नेमकं शिल्पाला काय बोलतो, जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉसच्या (Bigg Boss 18) घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. यंदाचा 'वीकेंड का वार' खूप गाजला. सलमान भाईने अनेकांची शाळा घेतली. तर काहींचे कौतुक केले. या 'वीकेंड का वार' मध्ये सदस्यांना इतर सदस्यांचे खरे चेहरे समजले. बिग बॉसच्या घरात आता विवियन डिसेनाचे एक वेगळेच रुप पाहायला मिळत आहे.

'वीकेंड का वार'ला विवियनची पत्नी नूर बिग बॉसच्या घरात येते. तेव्हा ती घरातील इतर सदस्य त्याच्यासाठी काय विचार करतात हे सांगते. ज्यामुळे विवियनला स्वतःला मोठा धक्का बसतो. 'वीकेंड का वार' संपल्यावर विवियन घरात सर्वांना जाब विचारताना दिसत आहे. विवियनने शिल्पाला देखील खडेबोल सुनावले आहेत.

'बिग बॉस 18' ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये विवियन अविनाश, ईशा आणि शिल्पाशी बोलताना पाहायला मिळत आहे. विवियन डिसेना शिल्पाला विचारतो की, "सलमान सर म्हणाले, विवियन ट्रॅकवरून उतरतोय, तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की, जर तुम्ही मला आपले समजत असाल तर मला कधीच का थांबवले नाही? कधी समजावले का नाही?"

विवियनच्या बोलण्यावर शिल्पा म्हणाली की, "मला कधीच वाटले नाही की तू ट्रॅकच्या बाहेर जात आहेस." यावर विवियन शिल्पाला विचारतो की, "तुम्ही करण वीर मेहराशी बोलता ना?" त्यावर शिल्पा हो बोलते. त्यानंतर शिल्पा आणि विवियन बोलाचाली सुरू होते. तसेच विवियन अविनाश आणि ईशाला देखील जाब विचारतो.

बिग बॉस 18 च्या घरातून गेल्या आठवड्यात तजिंदर सिंह बग्गा यांना घराचा निरोप घ्यावा लागला. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर कोण जाणार? तसेच नॉमिनेशन टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच नवीन टाइम गॉड कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT