Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: मित्र होणार शत्रू! बिग बॉसच्या घरात मैत्रीत येणार दुरावा? अविनाश सोडणार विवियनची साथ, पाहा VIDEO

Vivian Dsena-Avinash Mishra Friendship : बिग बॉसच्या घरात आता नात्यांचे चक्र बदलले पाहायला मिळत आहे. चक्क करणवीर-अविनाश यांच्यात मैत्री होणार आहे. नेमकं बिग बॉसच्या घरात चालू काय आहे, जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉसचा (Bigg Boss 18) सध्या 10 आठवडा सुरू आहे. घरातील सदस्य प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. घरात रोज एका नव्या कारणामुळे भांडण होताना पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात अनेक नाती बनतात. काही प्रेमाची, मैत्रीची तर काही शत्रू देखील होतात. मात्र अनेक वेळा ही नाती गेमनुसार बदलत राहतात. आता असेच काही बिग बॉसच्या घरात चित्र पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरात नुकतीच नॉमिनेशनचा टास्क पार पडला. या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात चाहत पांडे, दिग्विजय राठी, विवियन डिसेना (Vivian Dsena) , तीजेंदर बग्गा, करणवीर मेहरा आणि एडिन रोज या सदस्यांचा समावेश आहे. या नॉमिनेशन प्रक्रियेत चक्क अविनाशने विवियनला नॉमिनेट केले. बिग बॉसच्या घरात खूप वेळेपासून विवियन आणि अविनाशची मैत्री पाहायला मिळत होती.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अविनाश (Avinash Mishra) आणि करणवीर (karan veer mehra) एकमेकांशी बोलताना पाहायला मिळत आहेत. अविनाश करणला सांगतो की, करणवीर विरुद्ध विवियन असा गेम असेल तर यात मी कुठे आहे? यावर करणवीर बोलतो की, तू फेमस होण्यासाठी खेळत आहेस की जिंकण्यासाठी खेळत आहेस? आता तू दुसऱ्या स्थानावर खेळत आहेस. यावर अविनाश बोलतो की, मी विवियनसाठी खेळत नाही. मी माझा वैयक्तिक गेम खेळत आहे. तेव्हा करणवीर विवियनच्या विरोधात बोलत अविनाशला सांगतो की, या बाहेर येशील तेव्हा तुला समजेल विवियन फक्त स्वतःसाठी खेळतो. "

यंदाचा 'वीकेंड का वार' देखील खूप गाजला. फराह खानने घरातील सदस्यांची शाळा घेतली. घरातील त्यांची भूमिका स्पष्ट केली. काही सदस्यांचे कौतुक केले तर काहींना फटकारले. या 'वीकेंड का वार' मध्ये करणवीर मेहराचे भरभरून कौतुक झाले. बिग बॉसच्या घरातील नाती आता कोणते वळण घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT