Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : बिग बॉसचा नवा टाइम गॉड कोण? चक्क दोन आठवडे नॉमिनेशनपासून सुरक्षित

Shrutika Arjun : बिग बॉसच्या घरात नुकताच 'टाइम गॉड'चा टास्क पार पडला. या टास्कमध्ये रजत दलाल आणि करण वीर मेहरामध्ये मोठे भांडण झाले. बिग बॉसचा नवा टाइम गॉड दोन आठवडे नॉमिनेशनपासून सुरक्षित झाला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) खूप गाजत आहे. बिग बॉसचा आता ११वा आठवडा सुरू आहे. बिग बॉसच्या घरात नुकताच 'टाइम गॉड' टास्क पार पडला. या टास्क दरम्यान करण वीर मेहरा आणि रजत दलाल यांच्यात मोठे भांडण होते. करण वीर मेहरा रजतला पाण्यात टाकतो. ज्यामुळे रजत दलाल करण वीर मेहराच्या अंगावर धावून जाताना पाहायला मिळाला.

'टाइम गॉड'च्या टास्क दोन टीममध्ये खेळण्यात आला. या टास्कचा संचालक अविनाश मिश्रा होता. या टास्कमध्ये अविनाश मिश्राचे चित्र काढायचे होते आणि अविनाशला ज्या टीमचे चित्र आवडणार त्या चित्रावर अविनाशला सही करायची होती. अखेर अविनाशने 'टीम ए' च्या चित्रावर सही केली. त्यामुळे 'टाइम गॉड'चा शेवटचा टास्क करणवीर मेहरा, विवियन डिसेना, ईशा सिंह, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन (Shrutika Arjun ) आणि दिग्विजय राठी या सदस्यांमध्ये पार पडला. या सदस्यांनी देखील टास्कमध्ये खूप भांडणे केली.

'टाइम गॉड'च्या शेवटच्या टास्कमध्ये टोपलीत जास्तीत जास्त फळ गोळा करायची होती. या 'टाइम गॉड'च्या शेवटच्या टास्कमध्ये श्रुतिका अर्जुनने बाजी मारली आणि ती बिग बॉसची नवीन 'टाइम गॉड' बनली. तसेच बिग बॉसने शेअर केलेल्या माहितीनुसार, श्रुतिका अर्जुन दोन आठवडे नॉमिनेशनपासून सुरक्षित झाली आहे.

बिग बॉसच्या घरात प्रत्येक टास्क दरम्यान भांडण होणे हे आता सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र यंदा अनेक वेळा घरात सदस्यांमध्ये मारामारी देखील झाली. बिग बॉसचा यंदाचा 'वीकेंड का वार' खूप खास असणार आहे. कारण घरातील आठ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT