Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18' मध्ये नवीन ट्विस्ट; मित्रच होणार शत्रू, सात सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Bigg Boss 18 Nominated Contestants List: बिग बॉसच्या घरात सध्या नॉमिनेशनचे वारे वाहू लागले आहेत. सात सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या अधिक मनोरंजक होत जात आहे. रोज नवीन ट्विस्ट शोमध्ये पाहायला मिळत आहे. नुकताच 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानने घरातील सदस्यांची शाळा घेतली. तर दुसरीकडे एलिस कौशिकला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला.

आता 'बिग बॉस 18'च्या घरात आता नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. यात आता बिग बॉसने मोठा ट्विस्ट आणला आहे. घरात एवढे दिवस राहून अनेक नाती तयार होतात. काही प्रेमाची, मैत्रीची तर काही शत्रू देखील नाती बनली जातात आणि आता बिग बॉस या नात्यांमध्ये परीक्षा घेणार आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील आपले नाते पणाला लावायचे आहे. यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग बोलताना दिसत आहेत. ईशा अविनाशला बोलते "मला सुरक्षित राहायचे आहे" तर अविनाश देखील तिला हेच बोलतो. त्यावर ईशा बोलते की,"एकतर कोण तरी एक नॉमिनेट होईल किंवा आपण दोघेही नॉमिनेशनमध्ये जाऊ." तर दुसरीकडे विवियन डिसेना आणि शिल्पा शिरोडकर वाद घालताना पाहायला मिळत आहेत. शिल्पा विवियनला बोलते की, "मला नॉमिनेशनमध्ये जायचे आहे." त्यावर विवियन बोलतो की, "मला याचे कारण सांग तेही लॉजिकली..." यावर शिल्पा बोलते की, "तुला माझं लॉजिकली कधी समजत नाही." यावर हसत विवियन बोलतो की, तुमच्या लॉजिकलीमध्ये काही लॉजिकली मुळात नसते."

आता बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, सारा अरफिन खान, तिजेंदर बग्गा, कशिश कपूर आणि श्रुतिका अर्जुन या सात सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. या आठवड्यात घरातून कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच मिडवीक एलिमिनेशन होण्याची चर्चा देखास सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. तसेच या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाऊ शकतात असे देखील बोले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार? नाचक्की टाळण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT