Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18'मध्ये सात सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss 18 Nominated Contestants: बिग बॉसच्या घरात या आठवड्याला सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18'मध्ये (Bigg Boss 18) सध्या दिवसेंदिवस भरपूर ड्रामा पाहायला मिळत आहे. रोज नवीन राडा आणि ट्विस्टने शोची रंगत वाढत आहे. गेल्या आठवड्यात रोहित शेट्टी आणि एकता कपूरने घरातील सदस्यांची शाळा घेतली.

'बिग बॉस 18' च्या घरात या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये विवियन पोस्टमन बनतो. ज्याने घरातील सदस्यांसाठी पत्र आणले आहे. पण हे पत्र म्हणजे नॉमिनेशची टांगती तलवार होती. विवियन ज्या सदस्यांना पत्र देणार ते नॉमिनेश प्रक्रियेत सहभागी होणार होते.

नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्य पोस्टमनला म्हणजे विवियनला फोन करून आपल्याला कोणाला नॉमिनेट करायचे आहे हे सांगतात. यात सदस्य एकमेकांची नावे घेतात. यात करणवीर मेहरा ॲलिसच नाव घेतो. तर श्रुतिका कशिशचे नाव घेते. शेवटी विवियन करणवीर मेहराने दिलेले नाव रिजेक्ट करतो.

बिग बॉसच्या या आठवड्यात करणवीर मेहरा, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन, रजत दलाल, कशिश, दिग्विजय आणि तेजिंदर हे सात सदस्य नॉमिनेट झाले आहे. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार आणि कोण सेफ होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

नुकतेच घरातील रेशनवरून विवियन आणि कशिशमध्ये मोठे भांडण पाहायला मिळाले होते. घरातील इतर सदस्यांना रेशनची काळजी होती. तर विवियनला त्याची कॉफी हवी होती. या आठवड्यात 'वीकेंड का वार' सलमान खान घेणार का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा,पोलीस ठाण्याबाहेर आमनेसामने

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT