'बिग बॉस 18' चा (Bigg Boss 18) फिनाले आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोण होणार 'बिग बॉस 18' चा विजेता हे जाणून घेण्यास प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. श्रुतिकानंतर बिग बॉसच्या घरातून चाहत पांडेचा पत्ता कट झाला आहे. तिच्या जाण्यामुळे घरातील अनेक सदस्यांना वाईट वाटले आहे. चाहतचा बिग बॉसचा प्रवास खूप रंजक होता. आता बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर तिने घरातील सदस्यांविषयी मोठे खुलासे केले आहे.
चाहतने मुलाखतीत सांगितले की, जर मी आज बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली नसती. तर नक्कीच ईशाला घर सोडावे लागले असते. कारण बिग बॉसच्या घरात अविनाशशिवाय ईशाचे अस्तित्व नाही. ईशाने अविनाशला आपला नोकर म्हणून ठेवले आहे.
चाहतने मुलाखतीत शिल्पाविषयी सांगितले की, त्या सध्या खूप आहेत.
अविनाशबद्दल बोलताना चाहत बोली की, अविनाशने घरात माझ्याबद्दल खूप चुकीच्या गोष्टी बोलल्या आहेत. जेव्हा तुम्ही असे एखाद्या मुलीला बोलता तेव्हा तुमच्याही बहिणीचा विचार करा. अविनाशने अनेक वेळा चाहतच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
करणवीर मेहरा विषयी बोलताना चाहत म्हणाली की, त्याने माझ्या अश्रूंना मगरमच्छ के आंसू बोला आहे. जेव्हा तुम्ही वारंवार रडता तेव्हा लोक तुम्हाला हलक्यात घेतात.
चाहत विजेत्याबद्दल बोलताना म्हणाली की, "करणवीर मेहरा आणि चुम दरांग विजेता व्हायला पाहिजे. विशेषता चुम दरांगाने 'बिग बॉस 18' ची ट्रॉफी उचलली पाहिजे. तिने कोणाच्याही मदतीशिवाय इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे."
'बिग बॉस 18' फिनाले 19 तारखेला रविवारी होणार आहे. आता बिग बॉसच्या घरात 7 सदस्य आहेत. यात अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, रजत दलाल , करणवीर मेहरा, ईशा सिंह, शिल्पा शिरोडकर आणि चुम दरांग यांचा समावेश आहे. यांपैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण उचलणार आणि कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.