Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : बिग बॉसचा नवा टाइम गॉड कोण? टास्कमध्ये नेमकं काय घडलं?

Avinash Mishra : बिग बॉसच्या घरात नुकताच 'टाइम गॉड'चा टास्क पार पडला. यात कोणी बाजी मारली जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉसच्या (Bigg Boss 18) घरात रोज एक नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. जसजसा बिग बॉसचा शेवटचा टप्पा जवळ येत आहे तसा सदस्यांचा गेम प्लान बदलत जात आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात टाइम गॉडचा टास्क पार पडला. 'टाइम गॉड' च्या शर्यतीत अविनाश मिश्रा, रजत दलाल, चुम दरंग आणि श्रुतिका अर्जुन यांचा समावेश होता.

बिग बॉसने शेअर केलेल्या पोस्टनुसार, या आठवड्यात घराचा 'टाइम गॉड' अविनाश मिश्रा (Avinash Mishra ) झाला आहे. अविनाश 'टाइम गॉड' झाल्यामुळे ईशाला खूप आनंद झाला. अविनाश 'टाइम गॉड'झाल्यामुळे चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे. कमेंट्समध्ये प्रेक्षक अविनाशला शुभेच्छा देत आहेत.

रजत दलालच्या मदतीने अविनाश मिश्रा 'टाइम गॉड' बनतो. जर अविनाशने रजतला मदत केली नसती तर चुम दरांग 'टाइम गॉड' बनली असती. ज्याच्या भांड्यात शेवटपर्यंत पाणी शिल्लक राहणार होते, तो सदस्य 'टाइम गॉड' बनवणार होते. घरातील सदस्य मिळून रजत दलालला टास्कमधून बाहेर काढले. शेवटी 'टाइम गॉड'चा टास्क अविनाश मिश्रा आणि चुम दरांग यांच्यात पार पडला. त्यात रजत दलाल अविनाशला पाठिंबा देतो.

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात चाहत पांडे, दिग्विजय राठी, विवियन डिसेना , तीजेंदर बग्गा, करणवीर मेहरा आणि एडिन रोज हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता'वीकेंड का वार'ला बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT