बॉलिवूड मधील कपूर कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकतेच कपूर कुटुंबीयांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांची भेट घेतली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो कपूर कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी पीएम मोदींची भेट घेतली. या भेटीत रणबीर कपूर, आलिया भट्ट, नीतू सिंग, रिद्धिमा कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर आणि त्यांच्या घरातील इतर सदस्य उपस्थितीत होते. कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना अभिनेता राज कपूर यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या फिल्म फेस्टिव्हलचे आमंत्रण दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये अभिनेत्री करीना कपूरने (Kareena Kapoor) तिच्या दोन्ही मुलांसाठी (तैमूर आणि जेह) खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंदाने एका कागदावर दोन्ही मुलांची नावे लिहित आपला ऑटोग्राफ दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपूर कुटुंबीयांसोबत मन मोकळ्या गप्पा मारल्या.
14 डिसेंबरला राज कपूर यांचा 100 वा जन्मदिन आहे. हा फिल्म फेस्टिव्हल अभिनेते राज कपूर यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाचा गौरव करणारा आहे. 'राज कपूर 100 फिल्म फेस्टिव्हल' 13 ते 15 डिसेंबर 2024 या दरम्यान पार पडणार आहे. या काळात राज कपूर यांचे 10 चित्रपट 40 शहरातील 135 सिनेमा हॉलमध्ये दाखवले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.