Salman Khan joins Shah Rukh Khan's family at NMACC Opening Saam TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan At NMACC Opening: सलमानला पाहताच शाहरुखचा लेक धावला.. सलमानचं किंग खानच्या कुटुंबासोबत खास फोटोसेशन

Salman Khan joins Shah Rukh Khan's family at NMACC Opening: सलमान खानने शाहरुखच्या कुटुंबासोबत फोटो काढले.

Pooja Dange

Salman Khan With King Khan's Family: नीता अंबानी यांच्या मुंबईतील NMACCच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. शाहरुख खानचे कुटुंब देखील यावेळी दिसले.

गौरी खान, सुहाना खान आणि आर्यन खान रेड कार्पेटवर एकत्र आले. तसेच त्यांनी एकत्र फोटोग्राफर्सना पोज दिल्या. शाहरुखने मात्र रेड कार्पेट येणे टाळलं. शाहरुख नसला तरी त्याचा मित्र सलमान खानने शाहरुखच्या कुटुंबासोबत पोझ देत फोटो काढले. यावेळी पापाराझी आणि चाहत्यांना जल्लोष केला.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये गौरी, सुहाना आणि आर्यन रेड कार्पेटवर स्टायलिश एन्ट्री करताना दिसत आहेत. कॅमेऱ्यांसमोर पोज देता देता तिघेही चकित झाले. कारण सलमान येऊन त्यांच्यात सामील झाला होता. सलमानने आर्यनसोबत पोजही दिली आणि दोघेही अप्रतिम दिसत होते.

किंग खानचे कुटुंब पापाराझींसमोर पोज देऊन निघत होते इतक्यात सलमान खान तिथेआला. त्याने गौरी, आर्यन आणि सुहाना यांना कमी बॅक, कम बॅक असे म्हटले. तिघेही मागे फिरले आणि सलमानला पाहून थांबले. सलमाने त्या तिघांसोबत फोटो काढले. तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांनी कल्ला केला.

सुहानाने डार्क पिंक गाऊन घातला होता. तर गौरीने पीच रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. शाहरुख रेड कार्पेटवर दिसला नाही. पण त्याने स्टायलिस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. शाहरुखचे फोटो पाहून सगळेच भारावून गेले आहेत. शाहरुखने यावेळी ब्लॅक थ्री पीस घातला होता.

प्रियांका चोप्रा, निक जोनास, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, क्रिती सॅनन, वरुण धवन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह अनेकांनी नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या या कार्यक्रमात ग्लॅमरस एन्ट्री केली.

NMACC बद्दल बोलताना ईशा अंबानी म्हणाली, “नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर ही फक्त एक जागा नाहीये. हे माझ्या आई नीता अंबानी यांच्या कला, संस्कृती आणि भारतावरील प्रेमाचे प्रतीक आहे. NMACC द्वारे भारताने सर्वोत्कृष्ट कला जगाला दाखविणे आणि जगातील कला भारतात आणणे हे आहे. हा माझ्या आईचा दृष्टिकोन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१५४ जणांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली; ६८ जणांचा मृत्यू, ७४ जण बेपत्ता

Tandalachi Bhakri: मऊ, लुसलुशीत तांदळाची भाकर बनवण्यासाठी सोपी ट्रिक

Maharashtra Live News Update : कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाखालील अतिक्रमणे हटविण्यात येणार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर एका महिन्यात किती टोल वसुली? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे १ नंबर

Badlapur Water Supply : बदलापुरात ऐन पावसाळ्यात पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT