Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Advance Booking started Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Advance Booking सुरू; काही तासात केली करोडोंची कमाई

Salman Khan's Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan to release on Eid

Pooja Dange

Advance Booking Salman Khan' Movie KKBKKJ: सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पठान' चित्रपटनानंतर भाईजानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार यात शंका नाही. 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचे अॅडवान्स बुकिंग सोमवारपासून सुरु झाले आहे.

यावर्षी ईदला सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी 'किसी का भाई किसी की जान' घेऊन आला आहे. तब्बल ४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सलमान खानचा चित्रपट ईद दिवशी प्रदर्शित होत आहे. (Latest Entertainment News)

चित्रपटाचे अॅडवान्स बुकिंग वेगाने होत आहे. यावरून आपण अंदाज लावूच शकतो की सलमान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते किती उत्सुक आहेत. रविवारी मोजक्याच चित्रपटगृहांमध्ये बुकिंग सुरु होते.

मुंबईतील वांद्रे भागातील गिटी गॅलेक्सी या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये अॅडवानेस बुकिंग सुरू होताच, सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची जवळपास सर्व तिकिटे तासाभरात विकली गेली. गिटी गॅलेक्सीच्या शनिवार आणि रविवार शोची सर्व तिकिटे विकली गेली आहेत आणि चारपैकी तीन शो फुल्ल झाले आहेत.

सलमान खानच्या KKBJKKJ चित्रपटाच्या तिकिटांबद्दल सांगायचे तर मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये चित्रपटाचे तिकीट दर आठवड्याच्या शेवटी 130 ते 600 रुपयांपर्यंत गेले आहेत.

दिल्लीत शनिवार आणि रविवारी चित्रपटांचे तिकीट दर 250 ते 1200 रुपयांपर्यंत गेले आहेत. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, दग्गुबती व्यंकटेश, जगपती बाबू, पलक तिवारी, जस्सी गिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर राम चरणने या चित्रपटामध्ये कॅमिओ केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT