Salman Khan house firing google
मनोरंजन बातम्या

सलमान खान फायरिंग प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; थेट तिहार जेलमधून आली धक्कादायक अपडेट

Salman Khan House Firing Case: सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील गोळीबार प्रकरणात प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोईने मुंबई न्यायालयात शरणागतीसाठी अर्ज दाखल केला आहे.

Sakshi Sunil Jadhav

बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणातला प्रमुख आरोपी मानला जाणारा अनमोल बिश्नोई याने मुंबई न्यायालयात शरणागती पत्करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्यासाठी त्याने विशेष न्यायालयात अर्ज दाखल करत स्वत:ला या प्रकरणात कायदेशीरपणे हजर करण्याची परवानगी मागितली आहे.

सध्या अनमोल बिश्नोई हा दिल्लीतल्या तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, तो राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) एका प्रकरणात अटकेत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर एनआयएने त्याला अटक केली. आता सलमान खान यांच्या घराबाहेरच्या गोळीबार प्रकरणातसुद्धा न्यायालयीन प्रक्रियेला सोमोरं जाण्याची तयारी त्याने दाखवली आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात अनमोल बिश्नोईने निष्पक्ष सुनावणीवर विश्वास असल्याचं त्याने सांगितलं आहे. तसेच तिहार कारागृह प्रशासनाला प्रॉडक्शन वॉरंट जारी करण्यात यावं, कारण त्याला मुंबई न्यायालयात हजर करून शरणागतीची प्रक्रिया पूर्ण करता येईल, अशी मागणीही त्याने केली आहे. या अर्जावर विशेष न्यायाधीश एस. आर. नवेंदर यांनी सरकारी वकिलांना उत्तर सादर करण्याचे निर्णय घेतले आहेत.

१४ एप्रिल २०२४ रोजी दोन दुचाकीस्वारांनी सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.

या प्रकरणात विक्की गुप्ता, सागर पाल, सोनू कुमार बिश्नोई, मोहम्मद रफीक चौधरी आणि हरपाल सिंह यांच्यासह अनेक आरोपींवर खटला सुरू असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातल्या तीन साक्षीदारांचे जबाबही आत्तापर्यंत नोंदवण्यात आले आहेत. आता अनमोल बिश्नोईच्या शरगातीच्या अर्जामुळे या चर्चेत असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीत महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT