Ashneer grover in big boss 18 yandex
मनोरंजन बातम्या

Big Boss 18: अशनीर ग्रोव्हरची बिग बॅासमध्ये एन्ट्री; सलमान खानने घेतली शाळा,VIDEO व्हायरल

Ashneer grover entry in bigg boss18: प्रसिद्ध बिजनेसमॅन अशनीर ग्रोवर सलमान खानच्या बिग बॅास १८ मध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे. बिग बॅास शोच्या एका प्रोमोनुसार अशनीर ग्रोवर बिग बॅासच्या घरात एन्ट्री करणार आहेत. यावेळी होस्ट सलमान खानने अशनीरची शाळा घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध बिजनेसमॅन अशनीर ग्रोव्हर हे आपल्या वक्त्व्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या बिनधास्त आणि परखड विधानांनी सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घातला आहे.अशनीर ग्रोव्हर हे 'भारत पे' चे सह संस्थापक आहेत. शार्क टॅंक इंडिया सीझन १ मध्ये ते जज आणि निवेशक होते. यावेळी त्यांच्या बोलण्याच्या अंदाजाला काही लोकांनी पसंती दिली तर काही लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले.अशनीर आपल्या इंटरव्हयूज मध्ये सुद्धा तितकेच फायर मोड मध्ये असतो.आणि कधी कधी वादग्रस्त विधानांनी नवीन वादांना आमत्रंण देत असतो. अशाच एका इंटरव्हयू मध्ये त्यांनी सलमान खानवर भाष्य केले होते. आपल्या 'भारत पे' कंपनीसाठी सलमान खानला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यासाठी किती पैसे मोजावे लागले याचा खुलासा त्यांनी एका इंटरव्हयू मध्ये केला होता.

बिग बॅास १८ च्या एका प्रोमोनुसार अशनीर ग्रोव्हर बिग बॅास मध्ये एन्ट्री करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रोमोनुसार, अशनीर ग्रोव्हर आणि सलमान खान बिग बॅास शोच्या स्टेजवर एकत्र दिसत आहेत. यावेळी अशनीरने सलमान खानवर केलेल्या वक्तव्यांवर सलमान खानने त्याची शाळा घेतली आहे. त्यातच सोशल मीडियावर अशनीरचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बिग बॅास १८ च्या वीकेंड का वार मध्ये रविवारी अशनीर ग्रोव्हर दिसणार आहे. यावेळी अशनीर शोच्या स्टेजवर येताच सलमान खानने त्याला खडेबोल सुनावले आहेत. 'मी तुम्हाला माझ्याबद्दल बोलताना ऐकला आहे. की याला मी येवढ्या पैशांमध्ये साइन केले आहे, तेवढ्या पैशांत साइन केले आहे. सर्व आकडे चुकिचे दिले आहेत मग हे सगळ तर दुट्पपीपणा (दोगलापन) आहे का ?' सलमान म्हणाला.

अशनीर ग्रोव्हरच्या अॅटीट्यूडवर सलमानचा आक्षेप

बिग बॅास होस्ट सलमानच्या प्रश्नाला उत्तर देताना अशनीर म्हणाला पॅाडकास्ट मध्ये मला चुकिच्या पद्धतीने दर्शवण्यात आले आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून साइन केले होते, तो आमचा सगळ्यात स्मार्ट मूव होता. त्यावर सलमान म्हणाला, मी तुमचा व्हिडिओ पाहिला आहे. जसे आता तुम्ही नम्रपणे बोलत आहात अशी टोन तुमची पॅाडकास्टमध्ये बोलताना नव्हती. तेव्हा तुमचा अॅटीट्यूड वेगळा होता. या व्हायरल झालेल्या प्रोमोनंतर नेटकऱ्यांनी सुद्धा अशनीर ग्रोव्हरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

काय म्हणाला होता अशनीर ग्रोव्हर

शार्क टँकचे पूर्व जज अशनीर ग्रोव्हर एका पॅाडकास्टला इंटरव्ह्ययू देताना सलमान खानला 'भारत पे' साठी किती पैशांत साइन केले याचा खुलासा केला होता. अशनीर म्हणाला, 'सलमान खानला 'भारत पे' चा ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यासाठी सलमानच्या टीमला संपर्क साधला होता. तेव्हा त्याच्या टीमने जाहीरातीसाठी ७.५० कोटी घेणार असल्याचे सांगितले. तेव्हा मी कॅलक्युलेशन केले,आणि विचार केला १०० कोटी रुपये आहेत. ७.५० कोटी रुपये याला दिले. मग एक ते दोन कोटी जाहिरात बनवण्यासाठी आणि ती जाहिरात चालवण्यासाठी लागतील. मग मी विचार केला कि आपण मांडवली करुया, मी सलमान खानला बोललो पैसे कमी कर भाई, मग तो ४.५० कोटींमध्ये जाहिरात करण्यासाठी मान्य झाला'. याचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Edited by : Priyanka Mundinkeri

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT