Salman Khan - Pooja Hegde  Saam TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan's Dance Step: भाईजानच्या डान्स स्टेपने नेटकरी कन्फ्युज; 'अरे काय नाचलाय?' म्हणत केलं ट्रोल

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खान त्याच्या 'नईयो लगदा' या गाण्यातील डान्स स्टेपमुळे ट्रोल होत आहे.

Saam Tv

Salman Khan Get Trolled For Dance In Naiyo Lagda Song: दबंग सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर आणि गाणे प्रदर्शित झाले आहे. सलमान खानने त्याच्या या चित्रपटातील गाणे 'नईयो लगदा' 'बिग बॉस १६'च्या ग्रँड फिनालेमध्येही प्रमोट केले आहे. परंतु हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सलमान ट्रोल होत आहे.

सलमान खान त्याच्या 'नईयो लगदा' या गाण्यातील डान्स स्टेपमुळे ट्रोल होत आहे. सलमानला त्याच्या डान्सवरून अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. सलमान खान या गाण्यात वर्कआऊटसारखी डान्स स्टेप करत आहे असे नेटकाऱ्याचे म्हणणे. जर तुम्ही हा व्हिडिओ नीट पहिला तर सलमान लंजेस करत आहे असे वाटत आहे.

सोशल मीडियावर एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे, सलमान चित्रपटामध्ये पीटी शिक्षकांची भूमिका साकारत आहे का? तर दुसऱ्या नेटजार्याने म्हटलं आहे, भाई काहीही करू शकतो. तर आणखी एकाने लिहिले आहे की, असं वाटतंय भाई बॅटिंग करायला जात आहे आणि डान्स करत वर्मअप करत आहे.

सलमान खानच्या वर्कआऊट स्टेपचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी त्यावर अनेक कमेंट करत आहेत.

सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये जबरदस्त अॅक्शन आणि रोमान्स पाहायला मिळणार आहे. सलमान खानसह या चित्रपटामध्ये पूजा हेगडे आणि शेहनाज गिल देखील दिलणार आहेत. सलमान खानने शाहरुखच्या 'पठान'चित्रपटामध्ये कॅमिओ केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT